लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला : अशोका हेल्थ सिटीचे लोकार्पण
नाशिक : प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असताना आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत आहे. खासगी क्षेत्रातील आरोग्य संस्थांनी दुर्गम ग्रामीण भागात अधिकाधिक सेवा देण्याची गरज आहे. अशोका ग्रुपच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या, आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या नव्या पवार्र्स प्रारंभ होत आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी येथे केले.
अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी (दि. 12) लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख , संचालक डॉ. सुशील पारख व अंकिता पारख आदी उपस्थित होते.
यावेळी बिर्ला म्हणाले की, अशोका हेल्थ सिटीमुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना अत्याधुनिक उपचार त्यांच्या परिसरात उपलब्ध होतील आणि मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. अशोका हेल्थ सिटी ही अत्याधुनिक उपचार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णकेंद्रित सेवा यांचा संगम असलेली एकात्मिक आरोग्यनगरी आहे. अशोका ग्रुपच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बिर्ला पुढे म्हणाले की, केंद्र शासनही नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. निरोगी जीवनासाठी योग, पर्यावरणपूर्वक जीवनशैली आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रात सरकारसोबतच खाजगी क्षेत्रही कार्यरत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. येथील अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचार नव्हे, तर संशोधनाचे क्षेत्र बनावे, अशी अपेक्षा बिर्ला यांनी व्यक्त केली.
यावेळी अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया म्हणाले, की पायाभूत सुविधा निर्माणाच्या कामामध्ये अशोका ग्रुप गेल्या 25 वषार्ंपासून कार्यरत आहे. नाशिक ही कर्मभूमी आहे. समाजाप्रति बांधिलकी म्हणून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. या क्षेत्रातही सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न कायम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशोका हेल्थ सिटीमध्ये अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले थीम-आधारित महिला व बालरुग्णालय, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका आणि लवकरच सुरू होणारे अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स अशा महत्त्वाच्या संस्था एकाच परिसरात कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्यास वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांचा प्रभू श्रीरामाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अन्य मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.अंकिता पारख यांनी आभार मानले.
अत्याधुनिक उपचार, एकात्मिक आरोग्यनगरी
अशोका ग्रुपच्या दूरदृष्टीतून साकारलेली अशोका हेल्थ सिटी ही अत्याधुनिक उपचार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णकेंद्रित सेवा यांचा संगम असलेली एकात्मिक आरोग्यनगरी आहे. उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना महानगरांमध्ये न जाता जागतिक दर्जाच्या सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या आरोग्यनगरीमध्ये अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रातील महिलांसाठी व बालकांसाठी पहिले थीम-आधारित अत्याधुनिक रुग्णालय, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कॉर्पोरेट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका जागतिक दर्जाच्या कर्करोग निदान व उपचारासाठी समर्पित केंद्र आणि लवकरच सुरू होणारे अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स, जे देशाला कुशल, संवेदनशील व गुणवंत नर्सिंग व्यावसायिक घडविणार आहे, अशा महत्त्वाच्या संस्था एकाच परिसरात कार्यरत राहणार आहेत.
महिला व बाल आरोग्यसेवेसाठी नवा मापदंड
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकार्पण. उत्तर महाराष्ट्रातील महिलांसाठी व बालकांसाठी समर्पित, अत्याधुनिक आणि थीम-आधारित हे पहिले रुग्णालय असून, सुरक्षित, आधुनिक, तंत्रज्ञानसंपन्न आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी त्याची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात महिलांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. यात वंध्यत्व उपचार, गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व सल्ला, गर्भधारणेनंतरची काळजी, उच्च जोखीम गर्भधारणा व्यवस्थापन, वेदनारहित प्रसूती, अत्याधुनिक प्रसूतिशास्त्र, लेप्रोस्कोपिक स्त्रीरोग शस्त्रक्रिया, प्रतिबंधात्मक महिला आरोग्य तपासणी आणि रजोनिवृत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. बालकांसाठी अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता विभाग, बाल अतिदक्षता विभाग, बाल सुपर स्पेशालिटी उपचार, आधुनिक लेबर सूट्स, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, अत्याधुनिक निदान सुविधा, लसीकरण सेवा, बालविकास मूल्यमापन केंद्र, तसेच 247 आपत्कालीन बालरोग सेवा उपलब्ध आहेत.
Need for health institutions to provide more and more services in remote areas.