नाशिक

नीट फिजिक्सच्या बाउन्सरने घेतली विद्यार्थ्यांची परीक्षा

नाशिक : विशेष प्रतिनिधी
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे घेण्यात आलेली नीट-युजी-2026 ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी (दि. 3 मे) देशभरात पार पडली. यंदा साधारण 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय काठिण्यपातळी पाहता अनेक विद्यार्थ्यांना फिजिक्स कठीण, तर बायोलॉजी सोपा गेला. विद्यार्थी आणि शिक्षण तज्ज्ञांच्या मते, पेपरचे स्वरूप संमिश्र होते.
शिक्षण तज्ज्ञांच्या मते, पेपरची काठिण्यपातळी पाहता यंदाचा सरासरी कट-ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा खाली येऊ शकतो किंवा स्थिर राहू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटीचा सखोल अभ्यास केला आहे, त्यांना केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये चांगले गुण मिळतील, असे एका नामांकित शाळेतील शिक्षिका प्रा. दीपाली सोनवणे-पाटील यांनी सांगितले.
बहुतांश विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्राचा पेपर सर्वांत कठीण असल्याचे सांगितले. गणितावर आधारित (कॅलक्युलेटिव्ह) प्रश्नांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला. प्रा. सोनवणे-पाटील यांच्या मते, काही प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचे होते. रसायनशास्त्र हा पेपर मध्यम स्वरूपाचा होता. यात ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीचे प्रश्न थेट एनसीईआरटी पुस्तकांवर आधारित होते; परंतु फिजिकल केमिस्ट्रीचे प्रश्न थोडे वेळखाऊ होते. दरवर्षीप्रमाणे जीवशास्त्राचा पेपर तुलनात्मकदृष्ट्या सोपा होता. मात्र, विधाने आणि कारणे प्रकारचे प्रश्न जास्त असल्यामुळे तो वाचण्यात अधिक वेळ गेला.
काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, 2025 च्या तुलनेत 2026 चा पेपर अधिक आव्हानात्मक होता. विशेषतः फिजिक्समधील लांबलचक कॅल्क्युलेशन्समुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले. ‘बायोलॉजी सोपा होता, पण फिजिक्सने खर्‍या अर्थाने कसरत करायला लावली,’ अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील एका केंद्रावर परीक्षार्थीने दिली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी साधारणपणे परीक्षेच्या दोन ते तीन आठवड्यांनंतर अधिकृत प्रोव्हिजनल अ‍ॅन्सर की प्रसिद्ध करते, अशी माहिती प्रा. दीपाली सोनवणे-पाटील यांनी दिली. म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना उत्तरे तपासता येतील. अ‍ॅन्सर की प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ठराविक शुल्क भरून प्रश्नांवर हरकती नोंदवण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ दिला जाईल. जून-2026 च्या मध्यापर्यंत नीट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये व त्रुटी

देशभरातील केंद्रांवर कडक ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. केंद्रांवर डिजिटल बायोमेट्रिक्स आणि सखोल तपासणीनंतरच प्रवेश देण्यात आला.काही तुरळक केंद्रांवर पेपर सुरू होण्यास थोडा विलंब झाल्याच्या बातम्या आहेत. मात्र, एनटीएने कोणतीही मोठी तांत्रिक चूक किंवा पेपरफुटीसारखी घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यंदा वैद्यकीय शिक्षणासाठीची चढाओढ वाढल्याने अर्जदारांची संख्या 23 लाखांच्या पार गेली होती. त्यामुळे कट-ऑफवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

NEET Physics bouncer took students’ exam

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

5 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

26 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

33 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

39 minutes ago