प.बंगालमध्ये ‘काँटे की टक्कर’; तामिळनाडूत ‘विजय’ची प्रतिष्ठा पणाला

नवी दिल्ली/कोलकाता : प्रतिनिधी
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज, सोमवारी (दि. 4 मे) जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या निकालांचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. सकाळच्या सत्रात 10 ते 11 च्या सुमारास प्राथमिक कल हाती येतील. दुपारी 2 वाजेपर्यंत बहुतांश राज्यांचे स्पष्ट चित्र समोर येईल. मात्र, चुरशीच्या लढती असलेल्या प. बंगालसारख्या राज्यात अंतिम निकालासाठी उशिरा रात्रीपर्यंत वाट पाहावी लागू शकते.
यंदा बंगालमध्ये 92.49 टक्के विक्रमी मतदान झाले आहे, जे 2011 च्या विक्रमी मतदानापेक्षाही जास्त आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. बंगालमधील ’फालता’ मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान होणार असल्याने त्याचा निकाल 24 मे रोजी जाहीर होईल.
तामिळनाडू : टीव्हीकेचा प्रभाव
तामिळनाडूच्या राजकारणात यंदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. सुपरस्टार विजय यांच्या ’तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. तामिळनाडूत सत्ताधारी डीएमके आणि प्रमुख विरोधी पक्ष एआयएडीएमके यांच्या परंपरागत लढतीत विजय यांनी तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राउंड रिपोर्टनुसार, विजय यांचा पक्ष अनेक जागांवर ’किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे. युवकांचा त्यांना असलेला मोठा पाठिंबा निकालात किती परावर्तित होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.
प्रशासकीय सज्जता, सुरक्षा
निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि स्थानिक पोलिसांची कडक सुरक्षा असेल. सकाळी 8:00 वाजता प्रथम टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल.
त्यानंतर 8:30 वाजता ईव्हीएम मधील मतांची मोजणी सुरू केली जाईल. प्रत्येक फेरीचे निकाल निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर रिअल-टाईम अपडेट केले जातील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 रँडमली निवडलेल्या मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट स्लिप्सचीही पडताळणी केली जाईल.

ममतादीदी की ’कमळ’?

सर्वांत मोठी चुरस पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. 294 जागांच्या या विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 148 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपमध्ये थेट लढत असून, दोन्ही पक्षांत अत्यंत कमी मतांचे अंतर राहण्याची शक्यता आहे.

केरळ, आसाम व पुद्दुचेरी

केरळ येथे सत्तांतर होणार की एलडीएफ पुन्हा इतिहास रचणार, याची उत्सुकता आहे. आसाममध्ये ईशान्य भारतातील या महत्त्वाच्या राज्यात भाजप आपली सत्ता राखण्यात यशस्वी होते का, हे आज स्पष्ट होईल. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही आज (दि.4) मतमोजणी होणार आहे.

Power in five states to be decided today

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

21 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

40 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

47 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

56 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago