नाशिक

मोटारसायकल चोरीतील नेपाळी चोरटा अटकेत

आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची यशस्वी कामगिरी

पंचवटी : प्रतिनिधी
तपोवनातील लक्ष्मण मंदिर परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा अवघ्या 24 तासांत छडा लावण्यात आडगाव पोलिसांना यश आले आहे. यात नवीनपुन तुररामपुन मगर (21, रा. के. के. वाघ कॉलेजचे मागे, आडगाव) यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी हा मूळचा नेपाळमधील चौजारी (रूखुम) येथील आहे.
रामानंददास गुरुलक्ष्मणदास बैरागी (25, रा. श्री साक्षीगोपाल मंदिर, तपोवन) यांची मोटारसायकल 15 फेब्रुवारीस हॅन्डल लॉक असताना चोरीला गेली होती. त्यांनी याबाबत आडगाव पोलिसांकडे तक्रार करताच गुन्हे शाखेने तपासास प्रारंभ केला. हवालदार दादासाहेब वाघ व सुमित शिंदे हे वाहनाचा शोध घेत असताना त्यांना एक युवक चोरीचे वाहन घेऊन पार्कसाइट समोरील रस्त्यावरून घेऊन जात आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने तिथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्यास पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता मोटारसायकल चोरीच्या घटनांची कबुली दिली. त्याने दडवून ठेवलेल्या हिरो एचएफ डिलक्स (एमएच 15 एचएल 0179), हिरो पॅशन प्रो (एमएच 15 सीवाय 9395), होंडा मोपेड (एमएच 15 डीपी 1387), बजाज मोटारसायकल (एमएच 15 बीटी 3025), हिरो होंडा मोटारसायकल (एमएच 15 एझेड 7-8 नंबर खोडलेला) व काही मोटारसायकलींच्या चाव्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक पंचमुख, हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, परदेशी, काटकर, आव्हाड, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, दीपक भुजबळ, श्रीमती बच्छाव यांनी ही कामगिरी बजावली.

Nepali thief arrested for stealing a motorcycle

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago