नाशिक

नाशकात अठरा हजार जन्मनोंदींवर संशय

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेकडून 2001 नंतरच्या जन्म नोंदी ऑनलाइन केल्या जात आहेत. मात्र, यात अठरा हजार नावे संशयास्पद असून, हा जन्म नोंद प्रमाणपत्र घोटाळा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. संबंधिताकडे जन्म प्रमाणपत्र आहे का हे तपासावे व खोट्या नोंदी असल्यास दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या
यांनी केली.
सोमय्या यांनी सोमवारी (दि. 16) महापालिकेला भेट दिली असता, यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेत बोगस जन्म नोंदींसंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी बांगलादेशी, रोहिंगे यांच्या घुसखोरीसंदर्भात पत्रकार परिषदेत आरोप केले. राज्यातील पंचवीस महापालिकांत जाऊन तेथे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींवर कारवाईची मागणी करणार आहोत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध जोडला आहे. ही महाराष्ट्राशी गद्दारी असून ती भाजप मान्य करणार नाही असे सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केले. मालेगाव मध्ये तीन हजार 977 खोट्या जन्म नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी एक हजाराहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला. नाशिक महापालिकेकडून जन्म नोंदी ऑनलाईन करणे सुरु असून त्यात अठरा हजार नावे घुसविण्यात आली असून ती संशयास्पद असल्याचा खळबळजनक आरोप सौमय्या यांनी केल्याने खळ्बळ उडाली आहे. महापौर व आरोग्य विभागाने चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. सातपूर येथे शेख नायजा नूर मोहंमद याचे जन्म प्रमाणपत्र खोटे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येेणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
प्रश्न न आवडल्याने संताप
सरकारने गेल्या अकरा वर्षात किती अनधिकृत बाग्लांदेशीना देशाबाहेर काढले व त्यासंदर्भात डाटा आहे का ? असा प्रश्न सोमय्यांना विचारला असता त्यावर त्यांनी उत्तर देण्याएवजी पत्रकारांना हा वन टू वन प्रोग्राम आहे का ? असा उलट सवाल करत संताप केला.

खोट्या जन्म नोंदींची मनपाकडून चौकशी
किरीट सोमय्या यांनी खोट्या जन्म नोंदी संदर्भात मनपाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. यावेळी सातपूर विभागीय कार्यालयातून एका महिलेला बनावट जन्म दाखला दिल्याचा आरोप आहे. महापालिकेकडून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास जन्म-मृत्यू दाखला देणारे कर्मचारी व दाखल्यावर स्वाक्षरी करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल.
-हिमगौरी आहेर-आडके, महापौर, मनपा

Suspicion over 18,000 birth records in Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago