नाशिक

दुचाकी वाहनांसाठी बुधवारपासून आरटीओत नवीन मालिका

पंचवटी : प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे दुचाकी वाहनांसाठी (एमएच 15-केएक्स ) ही नवीन मालिका बुधवार (दि. 1एप्रिल) पासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीनिवास जेल्लावार यांनी दिली. आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज 1 एप्रिल डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 2.30 वाजेपर्यंत या कार्यालयाच्या आवक-जावक कक्ष क्रमांक विभागात जमा करणे अनिवार्य राहील. एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थितीत बदलून किंवा रद्द करता येणार नाही. राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍या व्यक्ती /संस्थेच्या नावे हस्तांतरित होणार नाही. भरलेले शासकीय शुल्क कुठल्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात येईल.
ज्या अर्जदारांचा आकर्षक क्रमांक लिलाव प्रक्रियेसाठी समाविष्ट असेल, अशा अर्जदारांनी लिलावात भाग घेण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी येत्या गुरुवार (दि.2) दुपारी 4 पर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी कोणत्याही बोलीच्या रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावा.

New series for two-wheelers in RTO from Wednesday

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago