सिडको : विशेष प्रतिनिधी
पाथर्डी परिसरात पाण्याची कमतरता जाणवत असतानाच वाहिन्यांवरील गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या व्हॉल्व्हमधून गळती होत असून, हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याचबरोबर या गळतीमुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
प्रभाग क्रमांक 30 मधील राजश्री कॉलनीच्या मागील भागात पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्व्हमधून गळती होत असून त्यातून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रभाग 30 आणि 31 मध्ये अशा प्रकारच्या गळतीच्या घटना वारंवार घडत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी 29 मार्च रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. अशा परिस्थितीतही गळतीकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून उपलब्ध पाण्याचीही नासाडी होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जलवाहिन्यांवरील गळती तातडीने दुरुस्त करून व्हॉल्व्ह स्वच्छ करावेत आणि त्यावर झाकणे बसवावीत, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
Water wastage due to leaks in pipes
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…