नाशिक :प्रतिनिधी
नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात झाल्यानंतर वर्षातील पहिल्या दिवसाची सुरूवात देवाच्या आशीर्वादाने करण्यासाठी रात्रीपासून अनेक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती. आज 2023 या वर्षातील पहिला दिवस आहे.. पहिला दिवस चांगला गेला तर वर्ष आनंदात जाईल असे मानण्यात येते. त्यामुळे मंदिरात जात नवीन वर्षाची सुरूवात करण्याकडे नागरिकांचा कल आहे.. त्यात नाशिक शहर हे धार्मिक पर्यटन स्थळ असल्याने देशभरातून नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक दाखल झाले आहेत. नाशिक शहरातील प्रमुख धार्मिक स्थळासह त्रंबकेश्वर ,वणी ,शिर्डी या धार्मिक स्थळांना पर्यटक आणि नाशिकक जात आहेत. शहरातील पंचवटी,इंद्रकुंड ,रामकुंड,कपालेश्वर मंदिर,काळाराम मंदिर ,नवश्या गणपती, सोमेश्वर ,बालाजी मंदिर , गोराराम मंदिर,तपोवन,मुक्तीधाम,भगूर,पांडवलेणी तसेच नवीन झालेल्या सुंदर नारायण मंदिरातही पर्यटकासह ,नाशिककरांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
नवीन वर्षाचे औचित्य साधत नागरिक दर्शनासाठी करण्याची शक्यता असल्याने अनेक मंदिर ट्रस्टने रात्रीही मंदिरे सुरू ठेवली होती. त्यात वणी गडावरील सप्तशृंगी मातेचे मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले होते. त्यामुळे देवाचा मनोभावे आशीर्वाद घेत नवीन वर्षाचे नवीन संकल्प करत नवीन वर्षाची सुरूवात केली जाणार आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक निर्बंध असल्याने मंदिरेही बंद होते .त्यामुळे नवीश वर्षाची सुरूवात देवदर्शनाने करता आली नव्हती. मात्र यंदा निर्बंधमुक्त थर्टी फर्स्ट आणि नववर्ष साजरे होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहेत.