नाशिक

सिन्नरमध्ये 40 फुटी गुढी उभारून होणार नववर्षाचे स्वागत

लेझीम, मल्लखांब, स्कुटी रॅलीसह भव्य शोभायात्रा

सिन्नर : प्रतिनिधी
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी सिन्नर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गुढीपाडव्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 40
फुटी भव्य गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. 19 मार्च रोजी सकाळी 6.30 वाजता ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रेला सुरुवात होणार आहे.
शोभायात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून होणार आहे. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढली जाणार आहे. महापुरुषांच्या वेशभूषेतील तरुण-तरुणी, पारंपरिक पोशाखातील महिला तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि आकर्षक देखाव्यांमुळे सिन्नरकरांना उत्सवाचा आनंद अनुभवता येणार आहे. सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या शोभायात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदा रामायण व महाभारतातील प्रसंगांचे सादरीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन प्रात्यक्षिके, सुमारे 300 मुलांचे लेझीमपथक, वीरांची डफवाद्यासह मिरवणूक, मल्लखांब सादरीकरण, महाविद्यालयीन मुलींची स्कुटी रॅली तसेच सायकलिस्ट ग्रुपचा सहभाग ही यंदाची प्रमुख आकर्षणे ठरणार आहेत. याशिवाय रोटरी क्लब आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून विविध विभागांची माहिती देणारे चित्ररथही शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या काढून, भव्य पालखीवर पुष्पवृष्टी करून आणि मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

बैठकीत नियोजनाला अंतिम रूप

गुढीपाडवा शोभायात्रेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, उपाध्यक्ष प्रा. राजाराम मुंगसे, कार्याध्यक्ष प्रकाश नवसे तसेच प्रा. जावेद शेख, दत्ता जोशी, अनिल जाधव, संतोष शेलार, गणेश तांबोळी, अर्चना पाटील आदी उपस्थित होते. यावेळी गणेश पालखी, अश्वारूढ महापुरुष, लेझीम पथक आणि पारंपरिक वाद्यांचे नियोजन निश्चित करण्यात आले.

New Year will be welcomed by erecting a 40-foot gudi in Sinnar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago