नाशिक

निदा खानची नाशिक कारागृहात रवानगी

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
टीसीएसमधील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिचा पोलीस कोठडीतील मुक्काम संपला आहे. तब्बल दोन महिना पोलिसांना गुंगारा देणार्‍या गर्भवती निदा खानला नाशिकरोड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिची रवानगी आता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर निदा खानला सोमवारी (दि. 11) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
निदा खान हिच्यावर असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर सरकारी पक्ष आणि बचावपक्षात जोरदार युक्तीवाद झाला होता. पोलीस कोठडीदरम्यान निदा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. या तपासात काही महत्त्वाचे दुवे हाती लागल्याचे समजते. निदा खानच्या वतीने अ‍ॅड. राहुल कासलीवाल यांनी काम पाहिले.
गेल्या चार दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी निदा खानकडून गुन्ह्याशी संबंधित माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. फरार असताना तिला कोणी आश्रय दिला आणि धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे कोठे जोडलेले आहेत, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. कुटुंबातील सदस्यांसोबत समोरासमोर चौकशी करून पोलिसांनी अनेक विसंगती दूर केल्याचा दावा केला आहे.
संशयित निदा खान गर्भवती असल्याने तिच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून न दिल्याने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. पुढील किमान 14 दिवस आता तिला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील काढावे लागणार आहेत.

Nida Khan sent to Nashik jail

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago