नाशिक

सिंहस्थात 260 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता

प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन

नाशिक : प्रतिनिधी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्ते, पाणी पुरवठा, वीज आणि ड्रेनेज यासारख्या महत्वाच्या सेवांची क्षमता वाढविण्यासाठी महापालिकेने जवळपास 15 हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार केला आहे. दरम्यान
सिंहस्थात पाण्याची गरज लक्षात घेता 260 दशलक्ष लिटर पाण्याची प्रतिदिन वाढ होणार आहे. त्यामुळे सिंहस्थ कालावधीत जवळपास 940 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा प्रतिदिन केला जाणार आहे.

नाशिक महापालिकेच्या सहा विभागांमध्ये एकूण 119 इतके जलकुंभ कार्यरत आहेत. या जलकुंभांची साठवण क्षमता 199 दशलक्ष लिटर इतकी आहे. 119 जलकुंभाव्यतिरिक्त सध्या शहरात 30 जलकुंभाची कामे प्रगतीपथावर असून, त्यात सर्वधिक नऊ जलकुंभांची संख्या पंचवटीत आहे. या 30 जलकुंभांची साठवण क्षमता 60 दशलक्ष लिटर इतकी होणार आहे. त्याचबराबर नाशिक पूर्व, पंचवटी आणि सातपूर या तीन विभागांमध्ये चार जलकुंभ प्रस्तावीत करण्यात आलेले आहे. यामुळे आठ दशलक्ष लिटर पाण्याची साठवण करता येणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनात सर्वाधिक महत्व असणार आहे ते पाणी पुरवठ्याला. त्यादृष्टीने मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून सिंहस्थासाठी येणारे साधुमहंत तसेच भाविकांसाठी प्रतिमानसी पिण्याचे आणि वापराच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहराला 520 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात वार्षिक सरासरी साडेपाच टक्के वाढ धरून सध्या 680 दशलक्ष लिटर पाणी वितरण होत असून, महापालिकेने रस्ते आणि पाणी पुरवठा या दोन बाबी प्रामुख्याने हाती घेतले असून, दररोज होणार्‍य पाणी पुरवठ्यात वाढ करण्याबरोबर जलकुंभांची संख्या वाढविणे, नवीन जलवाहिन्या तसेच जुन्या व जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलणे, जलशुध्दीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने संबंधीत कामे सुरू आहेत. शहराला सध्या प्रतिदिन 520 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठ केला जातो. त्यात साडेपाच टक्के वाढ गृहीत धरून 680 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याचे वितरण 2027-28 मध्ये केले जाणार आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणार्‍या साधुग्राममध्ये सुमारे दहा लाख साधु महंत उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून 150 दशलक्ष लिटर प्रतिदिन आणि सिंहस्थ पर्वणी व इतर कालावधीत दररोज सुमरे एक कोटी भाविकांची संख्या लक्षात घेता 110 दशलक्ष लिटर पाण्याची मागणी गृहीत धरण्यात आली असून, सिंहस्थ कालावधीत महापालिकेला दररोज एकूण 940 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे.

शहराला सध्या प्रतिदिन 520 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात साडेपाच टक्के वाढ गृहीत धरून 680 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याचे वितरण 2027-28 मध्ये केले जाणार आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणार्‍या साधुग्राममध्ये दहा लाख साधू, महंत उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून 150 दशलक्ष लिटर प्रतिदिन व सिंहस्थ पर्वणी व इतर कालावधीत रोज एक कोटी भाविकांची संख्या लक्षात घेता 110 दशलक्ष लिटर पाण्याची मागणी गृहीत धरली आहे. पालिकेला रोज 940 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे.

260 million liters of water required in Simhastha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

4 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

9 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

13 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

18 minutes ago

मधमाशी : जीवसृष्टीतील सर्वोत्तम वरदान

आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…

23 minutes ago

शनि अमावस्येची काळरात्र

सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली…

27 minutes ago