दिंडोरीत कार विहिरीत पडल्याने नऊ जणांचा मृत्यू
दिंडोरी प्रतिनिधी
दिंडोरी शहरात खाजगी क्लासची गेट टुगेदर आटोपून घरी जाणाऱ्या दरगोडे कुटुंबीयांची ईरटीका कार शिवाजी नगर परिसरातील राजेंद्र राजे यांच्या विहिरीमध्ये पलटी होऊन बुडाली., त्यामध्ये विद्यार्थी व पालक असे 9 व्यक्ती ठार झाले आहे.
.
दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन hydra crane तसेच विहिरीतील पोहणारे व्यक्ती यांना बोलावून क्रेनच्या साह्याने गाडी ही ००.१५ वाजे चे सुमारास विहिरीच्या बाहेर काढण्यात आली असून त्यामध्ये खालील लोक मयत झाले आहेत
१) रेश्मा सुनील दरगुडे वय २७
२) आशा अनिल दरगुडे वय ३२
३) खुशी/शृष्टीअनिल दरगुडे वय १४
४) श्रेयस अनिल दरगुड वय ११
५) राखी सुनील दरगुडे वय ११
६) श्रावणी अनिल दरगुडे ११
७) समृद्धी राजेंद्र दरगुडे वय ७
८) माधुरी अनिल दरगुडे वय १३
९) सुनील दत्तू दरगुडे वय ३२
सर्व राहणार इंदोरे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हे मयत झाले असून, सदरची गाडी व सर्व प्रेते हे लोकांच्या मदतीने विहिरीच्या बाहे काढून शासकीय रुग्णालय दिंडोरी येथे आणलेले असून, गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली जात आहे.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…