निफाड : तालुका प्रतिनिधी
नायलॉन मांजामुळे सोमवारी (दि.8) नायलॉन मांजामुळे एका तरुणाचे नाक कापले गेल्याची घटना निफाड शहरात घडल्याने निफाड नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे होत शहरात नायलॉन मांजा विक्री करणार्यांची तपासणी सुरू करण्यात
आली आहे.
निफाड शहरातील सचिन बाळासाहेब पेंढारकर हे त्यांच्या मोटारसायकलवरून रसलपूर फाटा येथे असलेल्या त्यांच्या गॅरेजवर चालले होते. सचिन हे पूल पार करीत असतानाच सदरचा मांजा त्यांच्या नाकाला लागला. मांज्या अडकल्याचे कळताच त्यांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचे नाक मोठ्या प्रमाणात कापले जाऊन त्यातून रक्तस्राव होऊ लागला होता. साहजिकच पुलावरून जाणार्या प्रवाशांनी त्यांना तत्काळ खासगी दवाखान्यात हलविले. तेथे त्यांच्या नाकाला चार टाके टाकण्यात आले. औषधोपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले, नायलॉन मांजामुळे या तरुणाचा जीव थोडक्यात वाचला आहे.
सध्या मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्याने शहरात पतंग विक्री जोरात सुरू आहे. मात्र, या पतंगासाठी साधा दोरा वापरणे गरजेचे आहे. शहरात कुणी नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊन नायलॉन मांजाची विक्री करू नये.
-धीरज भामरे, मुख्याधिकारी, निफाड नगरपंचायत
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…