निफाडचा पारा सात अंशावर
द्राक्ष बागाईतदारांची चिंता वाढली
निफाड : प्रतिनिधी
निफाड तालुक्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे. शनिवारी सकाळी कुंदेवाडी येथील कृषि संशोधन केंद्रात पारा सात अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे
निफाड तालुक्यात दरवर्षी पारा घसरत असतो चालु हंगामात सात अंशावर पारा घसरण्याची निचांकी नोंद झाली आहे त्यामुळे तयार होत असलेल्या द्राक्षमालाची फुगवण थांबणार आहे तर परिपक्व द्राक्षमालाला कडाक्याच्या थंडीमुळे तडे जाण्याचा धोका आहे घसरते तपमान हे द्राक्ष बागाईतदारांची चिंता वाढवत आहे कडाक्याच्या थंडीपासुन द्राक्ष मालाची निगा राखण्यासाठी आवश्यकतेनुसार द्राक्ष बागाईतदारांनी पहाटेच्या वेळी ठिबक सिंचनने पाणी द्यावे शिवाय द्राक्ष बागांत शेकोटी पेटवुन धुराद्वारे उष्णता निर्माण करावी अशी महत्वपूर्ण काळजी द्राक्ष बागाईतदारांनी या नैसर्गिक संकटापासुन द्राक्षमाल वाचविण्यासाठी घ्यावी असे अवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी केले आहे