अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेत तडजोड नाही

मुंबई :
राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी देण्यात येणारा शासकीय पोषण आहार निकृष्ट असल्याची ओरड सातत्याने होत असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील एका अंगणवाडी सेविकेनेच विद्यार्थ्यांसाठी दिला जाणारा वाटाणा किती निकृष्ट आहे, हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर, संबंधित अंगणवाडीसेविकाचे निलंबन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता, महिला व बालकल्याण विभागाने बालकांच्या पोषणाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची 48 तासांत तपासणी करा, असे निर्देशच मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.
’9 ते 10 शिट्या काढूनही न शिजणारा पांढरा वाटाणा आणि शिजवूनही कच्चा राहणारा भरडा आम्ही लहान मुलांना कसा खाऊ घालायचा?’ असा उद्विग्न सवाल एका अंगणवाडी सेविकेने उपस्थित केला होता. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना या निकृष्ट अन्नावर तात्काळ बंदी घालण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, त्यांच्यावरच प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती. आता, महिला व बालविकास विभागाने बालकांच्या पोषण आहाराबाबत कडक भूमिका घेतली आहे.

No compromise on the quality of food in Anganwadis.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *