आता थेट गावातूनच पंढरपुरास करा प्रस्थान

पंढरीची वारी पूर्ण करी लालपरी
नाशिक ः प्रतिनिधी
एस.टी कडून आषाढीवारीसाठी ग्रुप बुकिंग आणि आरक्षणही उपलब्ध
आषाढीवारीसाठी ग्रुप बुकिंग आणि आरक्षणाची सोयही उपलब्ध करण्यात आली आहे.ग्रुप बुकिंगसाठी 45 जणांचा समूह असल्यास थेट आपल्या गावातून पंढरपुरासाठी जाण्यासाठी भाविकांना आरक्षण करता येणार आहे.त्यासाठी आगारप्रमुखांशी संपर्क करून कळविण्याचे आवाहन राज्य परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
एका गावातील एकत्रीत भाविकांना पंढरपूर यात्रेसाठी जाणार असल्यास ग्रुप बुकिंग आणि आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांना आपल्या गावातूनच थेट पंढरपुरास प्रस्थान करणे सुलभ होणार आहे.

 

 

नाशिक एक आणि दोन,मालेगाव,सटाणा,मनमाड, सिन्नर,लासलगाव,नांदगाव, इगतपुरी,येवला कळवण, पेठ, पिंपळगाव येथील आगार प्रमुखांशी संपर्क करण्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
आषाढीवारीसाठी पंढरपूरात भाविकांना जाण्या-येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या नाशिक विभागाच्या विविध आगारातून बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी पंढरपूर यात्रा 6 ते 14 जुलै या कालावधीत भरणार आहे.यानिमित्ताने आगाराच्या कक्षेत पंढरपूर येथे जाणार्‍या आणि येणार्‍या यात्रेकरूंसाठी बसेस सोडण्यात येणार असल्याचे विभागामार्ङ्गत कळविण्यात आले आहे.

Devyani Sonar

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

4 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

4 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

4 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

4 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

5 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

5 hours ago