नाशिक

नायलॉन मांजावर बंदी असताना वापर सुरूच

शहरात पक्षी, नागरिकांचा जीव मात्र धोक्यात

नाशिक : वैशाली लिलके
शहरात पतंगबाजीसाठी वापरल्या जाणार्‍या नायलॉन मांजावर (काचेचा मांजा) राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री आणि त्याचा वापर करणार्‍यांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नायलॉन मांजावर बंदी असताना वापर सुरूच आहे. त्यामुळे नाशिक शहरात पक्षी व नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
नाशिक शहरात नायलॉन मांजाच्या निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापरावर कडक निर्बंध आहेत आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई (गुन्हे दाखल करणे, हद्दपार करणे) केली जाते, कारण तो पक्षी, प्राणी आणि मानवी जीवितासाठी धोकादायक आहे. मकर संक्रांतीच्या काळात या मांजाचा वापर वाढतो म्हणून पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कारवाई तीव्र केली जाते, अनेक विक्रेत्यांवर छापे टाकून मांजा जप्त केला जातो.
मकरसंक्रांतीच्या काळात पतंगबाजी वाढते आणि त्याच वेळी नायलॉन मांज्यामुळे होणार्‍या अपघातांच्या घटना समोर येतात. यामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.या मांज्यामुळे अनेक पक्षी गंभीर जखमी होतात. त्यांच्या मानेला, पंखांना आणि पायांना खोल जखमा होतात. अनेक वेळा पक्ष्यांचा मृत्यू होतो. काही पक्ष्यांचे पंख पूर्णपणे कापले जातात, त्यामुळे ते पुन्हा उडू शकत नाहीत. त्यामुळे दरवर्षी दुचाकीस्वार, पादचारी व इतर व्यक्तींना गळा व डोक्याला गंभीर जखमा होण्याच्या घटना वाढतात. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे.

पर्यावरणप्रेमींची जनजागृती

नाशिकमधील पर्यावरणप्रेमी व स्वयंसेवी संस्था नायलॉन मांजाविरोधात जनजागृती करत आहेत. ‘पक्षी वाचवा’, ‘नायलॉन मांजाला नकार’, ‘सुती मांजा वापरा’ अशा मोहिमा राबवल्या जात आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने जागृती मोहीम राबविणे, शाळा-कॉलेजांमध्ये जनजागृती करणे आणि कठोर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचे विविध सामाजिक संघटनांनीदेखील म्हटले आहे.

Nylon rope continues to be used despite ban

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago