नाशिक

पंचवटीत तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून

काका-पुतण्याला अटक

पंचवटी : प्रतिनिधी
पेठरोडवरील अश्वमेधनगरमध्ये शनिवारी रात्री पूर्ववैमनस्यातून रवी संजय उशिले (वय 23, रा. सप्तरंग सोसायटीच्या मागे, हरिहरनगर, पेठ रोड) याचा खून करण्यात आला. याप्रकरणी दोघा हल्लेखोरांना अवघ्या दोन तासांत मुंबई महामार्गावरील विल्होळी येथून ताब्यात घेतले आहे. दोघे आरोपी काका-पुतणे आहेत. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.30 वाजता पेठरोडवरील अश्वमेधनगरमध्ये ही घटना घडली. रात्रीच्या जेवणानंतर वॉक करून घरी परतत असताना समाधान बंडू गोर्‍हे व रवी उशिले गप्पा मारत होते. यावेळी गल्लीतच राहणारे रवी याच्यावर ओम गवळी याने चॉपरने व आरोपी संतोष गवळी याने लाकडी दांडक्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात पाठीवर, पोटावर तसेच डोक्यावर वार करण्यात आला. यात वर्मी घाव बसल्याने रवीचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त शेखर देशमुख, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओ आॉफिसजवळील गजवक्रनगरमध्ये राहणारे ओम व संतोष गवळी यांनी हा हल्ला चढवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाला त्यांच्या मागावर पाठवले. तांत्रिक विश्लेषण तसेच मानवी कौशल्याचा वापर करून दोघा आरोपींना विल्होळी येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुलीवरून झाला होता वाद

यातील ओम हा संतोष याचा पुतण्या असून, रवी याच्याशी यापूर्वी मुलीच्या प्रकरणावरून वाद झाला होता. मात्र, त्यानंतर रवी त्या परिसरातील कामावरून काढले होते. शनिवारी रात्री रवी पुन्हा गल्लीत आल्याचे समजताच ओम हा काकाला घेऊन पोहोचला. तिथे झालेल्या बाचाबाचीनंतर हल्ला चढवण्यात आला. मृत रवीच्या पश्चात आई असून, ती धुणीभांडी करून पोट भरते. तिच्या आयुष्याचा आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

Youth murdered in Panchavati due to past enmity

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

23 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

23 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

24 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

24 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

24 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago