नाशिक

इलेक्ट्रिक बस डेपोसाठी ऑक्टोबरची डेडलाइन

नगरविकासच्या प्रधान सचिवांच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी
आडगाव परिसरात शंभर इलेक्ट्रिक बसेससाठी डेपो उभारला जातो आहे. सदर डेपो लवकरात लवकर करा, अशा सूचना राज्य शासनाचे नगरविकासचे प्रधान सचिव गोविंदराज यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. ऑक्टोबर अखेर डेपोचे पूर्ण काम मार्गी लागेल, असे महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने म्हटले. दरम्यान, सिंहस्थापूर्वी नाशकात इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.
नाशिक महापालिकेसह राज्यातील इतर शहरांसमवेत प्रधान सचिव गोविंदराज यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे इलेक्ट्रिक बस(पीएमपी)साठी सुरू असलेल्या बसडेपोच्या कामाचा
आढावा घेतला.
यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, विद्युतचे अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड, यांत्रिकीचे कार्यकारी अभियंता बाजीराव माळी आदींसह उपस्थित होते. गेल्या वर्षापासून आडगाव येथे शंभर इलेक्ट्रिक बससाठी डेपो बांधला जात आहे. महावितरणकडून सप्लायसह इतर बारीकसारीक कामे अद्यापही सुरू आहेत.
केंद्र शासनाच्या पीएमईअंतर्गत नाशिकला शंभर बसेस मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात पन्नास बसेस येणार आहेत. नववर्षाच्या जानेवारीमध्येच सदर बसेस शहरात येण्याची अपेक्षा आहे. मध्यंतरी महावितरणकडून पॉवर सप्लाय वेळेत न मिळाल्याने त्याचा फटका कामाला बसला. सोमवारच्या बैठकीत प्रधान सचिवांनी डेपोचे कामे लवकर करण्याच्या
सूचना दिल्या.

डेपोसाठी केंद्र-राज्याची मदत

डेपोच्या कामासाठी एकूण सतरा कोटींचा खर्च करण्यात येतो आहे. सहा कोटी केंद्र शासन, चार कोटी राज्य शासनाने दिले असून, पॉवर सप्लायसाठी सात कोटी केंद्राने दिले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago