इंधन पुरवठा होणार सुरळीत, टँकर चालकांचा संप मागे

इंधन पुरवठा होणार सुरळीत, टँकर चालकांचा संप मागे

मनमाड : आमिन शेख

पालक मंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जलज  शर्मा यांच्या मध्यस्थीने ट्रक व टँकर चालकांचा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे आता इंधन पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

पानेवाडी येथे दोन तास बैठक करून ट्रान्सपोर्टरशी यशस्वी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला . ट्रक चालकांच्या काही अडचणी होत्या त्या ऐकून घेत आम्ही केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करतो असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा   यांनी दिले. त्यानंतर संप मागे घेण्यात आला.काही वेळातच इंधन कंपनीतून इंधन पुरवठा सुरु करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कालपासून  सुरू असलेला टँकर ट्रक चालकांचा संप अखेर मिटला असुन आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मनमाडला येऊन पानेवाडी इंधन प्रकल्पात चर्चा केली ट्रान्सपोर्टर व चालकांसोबत चर्चा करून त्यांच्या अडीअडचणीं जाणून घेतल्या . आम्ही लवकरच केंद्राकडे तुमच्या अडीअडचणी सांगून त्यावर तोडगा काढू असे सांगितले अखेर ट्रान्सपोर्टर व चालकांनी जिल्हाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन संप मागे घेतला आहे.

नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये
काही पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक नाही अनेक ठिकाणी पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आता काही वेळातच पेट्रोल डिझेलचा सुरळीत पुरवठा सुरू होईल ज्या पंपावर पेट्रोल नाही त्या ठिकाणी पेट्रोल पोहोचवले जाईल नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago