नाशिक

चव्हाटा भागातील घर कोसळले; जीवितहानी नाही

जुने नाशिक : वार्ताहर
शहरात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्‍या जोरदार पावसामुळे येथील चव्हाटा परिसरातील देवी मंदिराच्या पाठीमागे असलेले एक जुने घर काल (दि.19) अचानक कोसळले. याशिवाय, त्या घराशेजारील एका घराची भिंतदेखील पडली. यामुळे दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, वडाळा रोडवरील रेणुकानगर परिसरातील संरक्षक भिंत कोसळण्याचा प्रकार काल सायंकाळी घडला. यामुळे रस्त्यावर दगड व विटांचा खच पसरला होता.
बुधवारी रात्रीपासून शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने जुन्या बांधकामांची स्थिती धोकादायक बनली आहे. तर जुने नाशिक नाशकातील अनेक घरांना प्रचंड धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, काल दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना झाली. या घटनेत सय्यदवाडा घर नंबर 3515 याचा काही भाग कोसळला. यानंतर त्याला त्वरित लागून असलेले विजय शिंदे यांच्या घराची भिंतदेखील पडली. दरम्यान, घराच्या वरच्या मजल्यावर दोन लहान मुले अडकली होती. त्यांना वाचविण्यात स्थानिक तरुणांनी मदतकार्य करून सुखरूप बाहेर काढले. हा वाडा सय्यद आणि शिंदे यांच्या मालकीचा असून, या ठिकाणी विजय शिंदे वास्तव्यास होते. तसेच आरिफ सय्यद यांचा परिवार दुसर्‍या ठिकाणी वास्तव्यास होता. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण पसरले असून, धोकादायक घरे व वाड्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात झालेल्या सततच्या पावसामुळे या घराच्या भिंतींना तडे गेले होते. शेवटी काल ते संपूर्णपणे कोसळले. घटनास्थळी धुळीचा ढग उडाल्याने काही वेळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच मनपा आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago