येवल्यात ईको कार व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात एक ठार ;एक गंभीर जखमी
येवला : आमिन शेख
– नगर -मनमाड महामार्गावर बाभुळगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास इको कार व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात होऊन या अपघातात ईको कार मधील चालक शांतीलाल सुरेश पावरा शिरपूर हा जागीच ठार झाला असून त्याच्यासोबत असलेला शेरसिंग रामदास पावरा राहणार बेलवाडी मध्य प्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे या अपघातानंतर नगर मनमाड वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती येवला शहर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे