नाशिक

मालेगाव तालुक्यात एक लाख 30 हजार 874 जनावरांचे लसीकरण

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष पशुधन लसीकरण मोहीम

मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत हजारो जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पावसाळ्यात वाढणारी आर्द्रता, चिखल आणि दूषित पाणी यामुळे पशुधनामध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेंंतर्गत गाय व म्हैसवर्गातील जनावरांना होणार्‍या लाळ खुरकुत (एफएमडी) आजाराविरोधात एक लाख 30 हजार 874 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच शेळ्या व मेंढ्यांमध्ये होणार्‍या पी.पी.आर. (पेस्ट डी पेटिट्स रुमिनंट्स) या संसर्गजन्य आजाराविरोधात 53 हजार 69 प्राण्यांना लस देण्यात आली आहे. सध्या घटसर्प आणि फर्‍या रोगावरील लसीकरणही सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.
पावसाळ्यात गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये लाळ खुरकूत, घटसर्प, फर्‍या, ताप, जंतसंसर्ग, त्वचारोग, तसेच
फुफ्फुसाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
लाळ खुरकुत आजारामध्ये जनावरांच्या तोंडात फोड येणे, लाळ गळणे आणि खुरांवर जखमा होणे अशी लक्षणे दिसतात. घटसर्पामध्ये अचानक ताप येणे, श्वसनाचा त्रास आणि मानेला सूज येते, तर फर्‍या रोगामुळे शरीरावर सूज आणि तीव्र तापाची लक्षणे आढळतात. शेळ्या व मेंढ्यांमध्ये पी.पी.आर. हा अत्यंत
संसर्गजन्य आजार मानला जातो.

प्रतिबंधात्मक उपाय
या आजारामुळे ताप, डोळे व नाकातून स्राव, जुलाब, खोकला आणि अशक्तपणा जाणवतो. याशिवाय पावसाळ्यात न्यूमोनिया, जंतसंसर्ग, तसेच खुरांशी संबंधित आजारांचाही धोका वाढतो. तालुक्यात सध्या एक लाख 10 हजार 185 गायी, 44 हजार 252 म्हशी, 62 हजार 359 शेळ्या आणि एक लाख 11 हजार 169 मेंढ्या असल्याची नोंद आहे. पशुपालकांनी जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवणे, दूषित पाणी टाळणे आणि वेळेवर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. वेळेत प्रतिबंधात्मक उपाय केल्यास पशुधनाचे आरोग्य चांगले राहून आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते, असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ अहिरे यांनी सांगितले.

One lakh 30 thousand 874 animals vaccinated in Malegaon taluka

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

57 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

60 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 hour ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 hour ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 hour ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago