नाशिक

आदित्य ठाकरे रविवारी नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना उपनेते तथा आमदार आदित्य ठाकरे येत्या रविवारी (दि. 24) नाशिक दौर्‍यावर येत आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, नितीन आहेर, माजी आमदार वसंत गिते यांनी दिली. ठाकरे यांच्या दौर्‍याच्या नियोजनासाठी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शालिमार येथील जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात झाली.
ठाकरे यांच्यासोबत राज्यसभा खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, युवासेना सचिव व आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, शिवसेना उपनेते तथा युवासेना चिटणीस अमोल कीर्तिकर, युवासेना कोअर कमिटी सदस्य सिद्धेश शिंदे, अभिषेक शिर्के, प्रियंका जोशी, युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, युवासेना विस्तारक मानस कुवर उपस्थित राहणार आहेत.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यात भव्यदिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमांचे आयोजन, तसेच शिवसैनिक नोंदणी अभियान व शिवसेनेची पुनर्बांधणी केली जात आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक आदींविषयी जिल्हानिहाय ग्रामीण भागातील तालुकास्तरावर गट-गणनिहाय, तर शहरात विभागनिहाय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. टेनिस बॉल स्पर्धा युवासेना चषकाचे आयोजन मखमलाबाद, नाशिक येथे करण्यात आले आहे.
व्यासपीठावर युवासेना विस्तारक मानस कुवर, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, सागर कोकणे, विक्रम रंधवे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे, महिला आघाडीचे जिल्हा संघटक स्वाती पाटील, नगरसेवक शैलेश ढगे, तात्या भामरे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, शिवसेना पदाधिकारी सुनील जाधव ऋषी वर्मा, उत्तम खांडबहाले, मोहन गांगुर्डे, गोरख वाघ, विजय काळादाते उपस्थित होते. बैठकीस नाशिक जिल्हा पदाधिकारी, अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Aditya Thackeray to visit Nashik on Sunday

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago