नांदगावला एसटी बस अल्टो कार
अपघातात दोन महिलांसह एक पुरुष मृत्युमुखी
मनमाड : आमिन शेख
नांदगाव शहरातील गंगाधरी जवळ एसटी बस व अल्टो कारच्या अपघातात दोन महिलांसह एक पुरुष मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली असुन या अपघातात एक 2 वर्षीय बालक गंभीर जखमी झाले असुन त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात येत आहे.अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव बस डेपोची चाळीसगाव नांदगाव एसटी क्रमांक एम एच 14 बीटी 4498 व
अल्टो गाडी एम एच 15 सीडी2057 ही भगूर येथून भडगाव कडे जात असताना समोरासमोर अपघात झाला या अपघातात अल्टो कारमधील दोन महिलेसह एक पुरुषाचा मृत्यू झाला असुन या कारमधील एक दोन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले असुन त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात येत आहे या अपघाताचे वृत्त समजताच आमदार सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले आहे एसटीच्या अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असुन याबाबत शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे .
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…