सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर-अंबड लिंकरोडवरील भोर टाउनशिपजवळील मोकळ्या जागेतील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडणाऱ्या चार शाळकरी मुलांपैकी एका ११ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव मयूर संजय भोंडवे असून तो जाधव संकुल परिसरात राहणारा होता.
बुधवारी दुपारी सुमारास ही घटना घडली. शाळा सुटल्यानंतर मयूर आपल्या तीन मित्रांसोबत घरी परतत असताना भोर टाउनशिपजवळील रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात खेळण्यासाठी उतरला. मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने चौघेही त्यात बुडू लागले. समोरच्या इमारतीतील काही नागरिकांनी ही घटना पाहून तत्काळ मदतीस धाव घेतली आणि चौघांनाही बाहेर काढले.
या वेळी नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि सतर्कतेमुळे तिघांचे प्राण वाचले. मात्र मयूरच्या नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रात्री ११ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विडी कामगारनगर परिसरात अशाच प्रकारे तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रस्त्यालगत उघड्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्या कर्मचार्यांच्या…
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…
दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण…
मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…
सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…