नाशिक : प्रतिनिधी
वीज कनेक्शन देण्याच्या मोबदलात 50 हजारांची लाच घेताना खाजगी सुरक्षा रक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले..शेख सुल्तान शेख अक्रम वय 28 वर्ष व्यवसाय बाऊंसर नेमणूक मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड मालेगाव रा.घर न 223, आयेशानगर, मालेगाव असे लाचखोर सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तक्रारदार यांना त्यांचे मालकीचे सर्वे न 260प्लॉट न 22 मालेगाव येथे बांधलेल्या पत्र्याच्या गोडाऊन मध्ये नवीन कर्मशिअल मीटर घ्यावयाचे असल्याने त्यांनी MSEB यांना ऑनलाईन अर्ज करून कोटेशन भरले होते.परंतु तक्रारदार यांना सर्वे न २६० प्लॉट न ३१,शॉप न२ देविका मल्ला,बाबा टॉवर,मालेगावप्रलंबित वीजचोरीचे बिल रुपये१,२६,३२४.९५/– तसेच कंपाऊंड बिल ४००००/– रुपये भरल्याशिवाय नवीन मिटर कनेक्शन मिळणार नाही असे मालेगाव पावर सप्लाय लिमिटेड मालेगाव यांचे कार्यालयातून तक्रारदार यांना सांगण्यात आले होते. आरोपी खाजगी इसम शेख सुल्तान शेख अक्रम यांनी सर्वे न २६० प्लॉट न ३१,शॉप न २ देविका मल्ला,बाबा टॉवर,मालेगाव हा प्लॉट
तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबीयां पैकी कोणाच्याही नावावर नसताना त्यावरील प्रलंबित बिल न भरण्याच्या बदल्यात काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ८०,०००/– ची मागणी करून तडजोडअंती ५००००/– रुपये दिनांक २५/०८ /२०२५ रोजी पंच समक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सापळा व तपास अधिकारी
पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे, पोलिस हवालदार प्रफुल्ल माळी
पोलीस नाईक विलास निकम चालक, पोलीस कॉन्स्टेबल परशुराम गायकवाड यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक भारत तांगडे
अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…