रोजंदारी कर्मचार्यांचे जनआक्रोश आंदोलन
नाशिक ः प्रतिनिधी
आदिवासी आश्रमशाळांत कार्यरत वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्यांची भरती बाह्य स्रोेतांद्वारे केली जात असल्याच्या निषेधार्थ हा अध्यादेश (जीआर) रद्द करावा, तसेच आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून 14 जिल्ह्यांतून विविध 40 ते 45 संघटनांनी सोमवारी (दि.25) नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनावर उलगुलान मोर्चा काढला. यात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती.
या मोर्चात राज्याच्या विविध ठिकाणांहून आलेले मोर्चेकरी सहभागी झाले होते. भरपावसात आदिवासींनी घोषणांचे फलक हाती घेत घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आमच्या हक्काची नोकरी आम्हाला द्या, आदिवासी वाचवा देश वाचवा, आदिवासीमंत्री हटाव आदिवासी बचाव, खासगीकरण हटवा-देश वाचवा अशा घोषणा या मोर्चात देण्यात आल्या. तपोवन ते आदिवासी आयुक्तालयासमोर गेले 48 दिवस सुरू असलेल्या आंदोलनस्थळापयर्ंत आदिवासींनी उलगुलान मोर्चा काढला होता.
यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार नितीन पवार, नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी, माजी आमदार धनराज महाले तसेच जवळपास 40 ते 45 संघटनांचे पदाधिकारी आदिवासी आयुक्तालयासमोर आंदालनस्थळी उपस्थित होते. भरपावसात या लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणांतून आदिवासींच्या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलन मागण्या मान्य होेईपयर्ंत सुरू ठेवण्याबद्दल आग्रही भूमिका मांडली.
यावेळी आमदान नितीन पवार यांनी सांगितले, की 25 आदिवासी आमदार व तीन खासदार हेे आदिवासींंसोबत आहेत. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा सल्ला पवारांनी दिला. 23 तारखेला कळवणच्या शाळा बंद केल्या. आता राज्यातील शाळा बंद कराव्या लागतील. बाह्य स्रोेतांद्वारे भरती थाबायला हवी. गेल्या काही वर्षांपासून रोजंदारी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. ते मूर्ख म्हणून शिकवतात का? शाळांचा निकाल 100 टक्के कसा लागतो? आदिवासींचे आरक्षण नाहीसे करण्याचा हा डाव असल्याचे पवारांनी सांगितले.
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील रोजंदारी तासिका वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आयुक्तालयासमोर महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी संघटनतर्फे जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली. सुमारे 4,300 कर्मचारी कार्यरत असूनही शासनाने 21 मे 2025 रोजी 1,791 शिक्षक पदे बाह्य स्रोत (कंत्राटी व खाजगीकरण) पद्धतीने भरण्याचा आदेश काढला. 16 नोव्हेंबर 2022 रोजी सुधारित आकृतिबंध लागू करून वर्ग-4 पदे मृत संवर्गात टाकण्यात आली. त्यामुळे हजारो कर्मचार्यांवर अन्याय झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
यासंदर्भात यापूर्वी आदिवासी विकासमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यासोबत संघटनेच्या अनेक बैठकाही झाल्या. मंत्री गिरीश महाजन व अशोक उईके यांनी वारंवार सकारात्मक आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्ष निर्णय न झाल्याने रोजंदारी कर्मचार्यांचा विश्वास उडाला आहे. 48 दिवसांच्या पाठपुराव्यानंतरही मागण्या न निकालात आल्याने अखेर सकल आदिवासी संघटनांच्या पाठिंब्याने आंदोलन करण्यात आले.
संघटनेने दिलेल्या अल्टिमेटमप्रमाणे संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास हा पायी बिर्हाड मोर्चा थेट मंत्रालय, मुंबईकडे निघणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, मोर्चादरम्यान कोणतीही अनिष्ट घटना घडल्यास त्याची जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील.
आदिवासी आयुक्तांनी स्वीकारले निवेदन
आदिवासी आयुक्तांनी निवेदन घेण्यासाठी आंदोलनस्थळी येण्यासाठी आग्रही भूुमिका आंदोलनकत्यार्ंंनी घेतली. राज्यभरातून आलेल्या 40 ते 45 संघटनांच्या पदाधिकार्यांनी मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांना आंदोलनस्थळी येण्याची विनंती केली होती. यावेळी आंदोलकांनी घोषणा देत परिसर दुमदुमूून गेला होता. पोलीस प्रशासनाने आंदोलनकत्यार्ंना शांतता राखण्याचे आवाहन केले.
प्रमुख मागण्या :
21 मे 2025 चा बाह्य स्रोताद्वारे 1,791 शिक्षक पद भरतीचा शासन आदेश तत्काळ रद्द करावा. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील कार्यरत वर्ग-3 व वर्ग-4 रोजंदारी कर्मचार्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच कामावर घ्यावे. वर्ग-4 कर्मचार्यांची मृत संवर्ग पदे पुन्हा जीवित करून 16 नोव्हेंबर 2022 चा आकृतिबंध रद्द करावा. सेंट्रल किचन योजना रद्द करून आश्रमशाळेत पूर्वीप्रमाणे भोजनव्यवस्था सुरू करावी. आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.
शहरात वाहतूक कोंडी
आदिवासींचा उलगुलान मोर्चा तपोवन, निमाणी बसस्थानक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून आदिवासी आयुक्तालयापर्यंत काढण्यात आला होता. यावेळी आंदोलनकत्यार्ंच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळेही वाहने अडकून पडल्याने रविवार कारंजा,पंचवटी, शालिमार, एन.डी. पटेलरोड, गडकरी चौक येथील वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता. ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना वाट करून दिली.
महिला आंदोलनकर्त्यांना अश्रू अनावर
आंदोनलस्थळी महिला आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून देत आमचे आंदोलन असेच सुरू राहील. आम्हालाही घरदार आहे. सण सुरू होत आहेत. सगळे निघून जातील, पण आमचा लढा येथेच सुरू राहील. आमच्या व्यथा आयुक्तांनी समजून घेत आमच्यासोबत एक दिवस राहून दाखवावे, अशी आर्त साद घातली. यावेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…