३१ मार्च २४ नंतरही कांदा निर्यातबंदी राहणार कायम
लासलगाव:-समीर पठाण
लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने ३१ मार्च २४ नंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे.
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे संतोष कुमार सारंगी यांनी दिनांक २२ मार्च रोजी एक ‘नोटीफिकेशन’ काढून ३१ मार्च २४ नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे येत्या ८ दिवसांनी तरी निर्यातबंदी हटेल आणि आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजार भाव मिळेल या प्रतिक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या परकीय व्यापार विभागाचे महासंचालक यांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सरंगी यांनी कांदा निर्यातबंदी कायम राहणार असे नोटीफिकेशन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे ७ डिसेंबर २३ रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागूू केली होती.ती ३१ मार्च २४ पर्यंत राहणार होती.मात्र नव्या निर्यात धोरणानुसार पुढील सूचना येईपर्यंत ही कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही वाढविण्यात आली असल्याचे त्यात म्हटले आहे. HS कोड 07031019 अंतर्गत 31 मार्च 2024 पर्यंत वैध असलेल्या कांद्याच्या निर्यातीवरील निर्यात प्रतिबंध पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आला असेही यात म्हटले आहे.
निर्यातीसंदर्भातील सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठ गमावण्याची वेळ आली आहे.निर्यात बंदी कांदा नुकसानीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.ऑगस्टमध्ये सुरूवातीला ४० टक्के निर्यातशुल्क लागू केल्यानंतर कांद्याचे भाव पडले होते.त्या विरोधात व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने बाजारसमित्या बंदला फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.केंद्राच्या निर्णयामुळे शेतकरी व व्यापारी दोघांचेही नुकसान झाले. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी केंद्राने निर्यातबंदीच जाहीर केल्याने बाजारभाव वाढीच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही धुळीस मिळाल्याने शेतकरी हैराण झाले.सध्या कांद्याला कमीत कमी सरासरी १३०० रुपये दर मिळत आहे. त्यातून शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…