नाशिक

शेतमाल ठेवायला जागा नसल्याने आज कांदा लिलाव बंद

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर बाजार समितीत सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यामुळे बाजारभाव घसरले आहेत. पावसाळी वातावरणात व्यापार्‍यांच्या खळ्यांवर कांदा ठेवायला जागा नसल्याने मंगळवारी (दि. 3) सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. याबाबतचे निवेदन व्यापारी संघटनेने बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे यांना दिले आहे.
सोमवारी सिन्नर बाजार समितीत 41 पिकअप व 152 ट्रॅक्टर अशा एकूण 193 वाहनांतून सुमारे 4,210 क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी कांद्याला जास्तीत जास्त 1,175 रुपये, किमान 400 रुपये तर सरासरी 975 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. चांगल्या दर्जाच्या कांद्यालाही 900 ते 1,000 रुपयेच दर मिळाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
कांद्याचे दर खूपच कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहेत. वाढती आवक, पावसाळी हवामान आणि कांदा साठवण्यासाठी जागेची कमतरता लक्षात घेता मंगळवारी लिलाव बंद ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.
ही मागणी व्यापारी संघटनेचे बी. एम. चकोर, योगेश्वर ट्रेडिंग कंपनी, रतनकाका अँड कंपनी, डी. एस. लढ्ढा अँड कंपनी, अनिल लहामगे, कन्हैयालाल पारख, विजय तेलंग, भैरवनाथ ट्रेडर्स आदी व्यापार्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, मंगळवारी शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या आवारात कांदा लिलावासाठी माल आणू नये, असे आवाहन सभापती श्रीकृष्ण घुमरे, सचिव विजय विखे आणि संचालक मंडळाने केले आहे.

Onion auction closed today due to lack of space to store farm produce

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago