शेतकरी हवालदिल : ढगाळ वातावरणामुळे या फवारण्या निष्फळ
लासलगाव : वार्ताहर
लासलगावसह ब्राह्मणगाव (विंचूर), पिंपळगाव नजीक, वेळापूर, आंबेगाव, कोटमगाव, टाकळी (विंचूर) परिसरातील गावांतील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कारण परिसरात मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या कांदा पिकावर ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विविध कीटकनाशकांच्या महागड्या फवारण्या करण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आता वातावरणात वारंवार होणार्या बदलामुळे कांदा पिकावर रोगांचा अटॅक वाढला आहे. प्रामुख्याने कांद्याची पात पिवळी पडणे, पातीवर काळे-तांबडे ठिपके पडणे आणि पात जळून जाणे अशा प्रकारचा करपा रोग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हा रोग पसरल्यामुळे कांद्याची वाढ खुंटली असून, त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे.
शेतकर्यांनी या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी केंद्रांतून हजारो रुपयांची महागडी औषधे आणून फवारणी करत आहे. मात्र, हवामानातील आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे या फवारण्या निष्फळ ठरत आहेत. एका बाजूला खते आणि बियाणांचे वाढलेले दर आणि दुसर्या बाजूला औषधोपचाराचा मोठा खर्च, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. पिकावर केलेला खर्चही आता निघणे कठीण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बँकांचे कर्ज आणि खासगी घेतलेले पैसे कसे फेडायचे, असा प्रश्न आता या भागातील शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. कृषी विभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत आणि बाधित शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सध्याच्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला करपा रोग, त्याचप्रमाणे फुलकिडीचा प्रादुर्भाव होत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी एम 45 रोको बाविस्टीन यासारखे बुरशीनाशक तर कीटकांच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रीन मोनोक्रोटोफॉस कराटे यासारखे कीटकनाशके फवारावी. या औषधांसोबत जैविक आणि वनस्पतीजन्य कीटकनाशके निम तेल, करंज तेल यांसारख्या औषधांचे मिश्रण करावे. फवारणी सकाळी लवकर किंवा दुपारून चार वाजेनंतर करणे योग्य आहे.
– सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगावOnion blight outbreak in Lasalgaon area
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…