गारपिटीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले
नांदगाव : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यात गुरुवारी (दि. 19) झालेल्या अवकाळी तसेच गारपिटीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रामुख्याने कांदा पिकाबरोबरच मका, बाजरी, डाळिंब, कलिंगड, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. सुपारीसारख्या असलेल्या गारपिटीने कांदा पिकाची वाताहत केली आहे,
शेतकर्यांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीने शेतकर्यांचे जणू कंबरडेच मोडले आहे. शेतीपिकांचे नुकसान झाल्यानंतर तात्काळ लोकप्रतिनिधींनी तत्परता दाखवत शेतकर्यांच्या बांधावर जात शेतकर्यांना धीर देण्याचा
प्रयत्न केला.
शेतकर्यांबाबत तत्परता दाखवत लोकप्रतिनिधी शेतकर्यांच्या बांधावर पोहोचले असले तरी आता तीच तत्परता शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी तात्काळ मदत मिळवून देण्यास दाखवतील का, हाही मोठा प्रश्न आहे. कारण गेल्या वर्षीदेखील शेतकर्यांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या पिकांचे
पंचनामे झाले. मात्र, बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते, तर नुकसान होऊनदेखील त्या शेतकर्यांना पीकविमा मिळू शकला नाही.
अर्थात अनेक तांत्रिक बाबी दाखवत विमा कंपन्यांनी पीकविमा नाकारला होता, ही बाबदेखील दुर्दैवी आहे. एवढेच नव्हे तर नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून दिल्या जाणार्या तुटपुंज्या मदतीसाठी तहसील कार्यालयाच्या पायर्यादेखील झिजवाव्या लागल्या आहेत. संबंधित यंत्रणेने शेतकर्यांसाठी सहानुभूती दर्शवत लवकरात लवकर पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवावा, अशी अपेक्षा आता शेतकर्यांकडून
केली जाते.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे महसूल विभागाचे तलाठी, पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी तसेच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त विद्यमाने पंचनाम्यांचे काम सुरू असून, नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे लवकरच पूर्ण करून वरिष्ठ पातळीवर त्याबाबतचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. बाधित झालेल्या क्षेत्रापैकी एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेत आहोत.
– सुनील सैंदाणे, तहसीलदार, नांदगाव
Onion wilt due to unseasonal weather
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…