नाशिक

शिंगवे ग्रा.पं. इमारतींवर बसविले सौर पॅनल

वाढत्या वीजबिलावर मात; आर्थिक बचत होणार

चांदवड : वार्ताहर
चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या शिंगवे ग्रामपंचायतीने शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने विविध शासकीय इमारतींवर 5 केव्ही एकूण 5 सौरऊर्जा पॅनल बसवून सौर क्रांतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. सौरऊर्जेचा असा प्रभावी वापर करणारी ही पूर्व भागातील पहिलीच ग्रामपंचायत करत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालय यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा पॅनल बसवून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सौर प्रकल्पामुळे महावितरणच्या वाढत्या वीजबिलातून ग्रामपंचायतीची मोठी आर्थिक बचत होणार आहे. तसेच, सौरऊर्जेवरील पथदिवे बसविल्याने वीज बचतीलाही मोठी चालना मिळाली आहे. पर्यावरणपूरक उपक्रम आणि डिजिटल सुविधांच्या माध्यमातून शिंगवे ग्रामपंचायतीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावात सध्या विविध मोठी विकासकामे प्रगतीपथावर असून, ग्रामपंचायत समृद्ध व सक्षम पंचायतीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सौरऊर्जेचा हा प्रभावी वापर केवळ आर्थिक बचतीसाठीच नव्हे, तर पर्यावरणाच्या रक्षणासाठीही मैलाचा दगड ठरणार असून, संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाचे कौतुक
होत आहे.

Solar panels installed on Shingve Gram Panchayat buildings

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago