देशभरातील आवकेत 24 टक्के घट; किरकोळ भाव 60 रुपये किलोवर
नवी दिल्ली/नाशिक : प्रतिनिधी
कांद्याचे नवे पीक बाजारात येऊ लागले, तरी सर्वसामान्यांना दरवाढीतून दिलासा मिळालेला नाही. देशातील अनेक किरकोळ बाजारांत गेल्या दीड महिन्यापासून कांदा सुमारे 60 रुपये किलो दराने विकला जात आहे. केंद्र सरकारने नाफेडमार्फत साठ्यातील कांदा बाजारात आणूनही दरात अपेक्षित घट झालेली नाही. प्रमुख उत्पादक राज्यांमधील आवक घटल्याने दर चढेच असल्याचे चित्र
आहे.
केंद्र सरकारच्या एगमार्कनेट पोर्टलवरील आकडेवारीनुसार, 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभरातील बाजार समित्यांमध्ये 4 लाख 63 हजार 407 टन कांद्याची आवक झाली. गेल्या वर्षी याच काळात ती 6 लाख 11 हजार 102 टन होती. म्हणजेच आवकेत तब्बल 1 लाख 48 हजार टनांची, अर्थात 24.17 टक्क्यांची घट झाली आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबरमध्ये ही घट अवघी 0.86 टक्के होती. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होते.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन प्रमुख उत्पादक राज्यांमधील एकत्रित आवक गेल्या वर्षीच्या 4.29 लाख टनांवरून यंदा 2.41 लाख टनांवर आली आहे. ही घट तब्बल 43.87 टक्के आहे. विशेषतः महाराष्ट्रातील आवक 2.30 लाख टनांवरून 1.41 लाख टनांवर घसरली आहे.
महाराष्ट्रात उत्पादन घटण्याची भीती
महाराष्ट्रात यंदा कांदा उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अल निनो, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि पूर यांचा पिकावर मोठा परिणाम झाला आहे. नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याच्या लागवडीत 35 ते 40 टक्के घट झाली असून, लाल कांद्याला सध्या सरासरी 4,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे लवकरच दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापारी आणि बाजार समितीतील सूत्रांचे म्हणणे आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले असताना, कांद्याच्या दरावर आता आवक वाढण्यावरच सर्व काही अवलंबून आहे.
Onions remain expensive despite the arrival of a new crop
जानेवारीच्या विक्रमी उच्चांकावरून 61 टक्क्यांची घसरण; 1980 व 2011 मधील उच्चांकही मागे मुंबई : प्रतिनिधी…
‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली मुंबई : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरातील मध्य-दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर निर्माण…
शायना एनसींच्या कृतीवर ठाकरे गट, काँग्रेसचा संताप; भाजपकडूनही माफीची मागणी, शिंदेंकडून मात्र पाठराखण! मुंबई :…
- सुजाता येवले फळबियांच्या शोधात वृक्षावृक्षांत धावत होती, डोळ्यात आसवे आणत होती. दुरवर गेलेल्या सहचरांना…
- अफजल पठाण कधीकाळी ज्यांच्याशिवाय दिवस सरत नव्हता, आज त्यांच्याशी बोलण्यासाठीही वेळ मागावा लागतो. एक…
पाणी हेच जीवन आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु, आज हेच जीवन संकटात…