नाशिक

जि.प.मध्ये ऑनलाइन हजेरी बंधनकारक सीईओ ओमकार पवार अ‍ॅक्शन मोडवर

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी ऑनलाइन हजेरी सक्तीचे आदेश देण्यात आले असून, गैरहजेरीवर थेट कारवाईची चेतावणी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली. दि.20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अनेक कर्मचारी ऑनलाइन हजेरी प्रणालीचा वापर टाळत असल्याचे आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांना अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या हजेरीचा अहवाल मागविला. या अहवालातून हजेरीबाबत मोठ्या प्रमाणावर अनियमितता समोर आली. यावर तत्काळ पत्र काढत पवार यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गास सक्त सूचना दिल्या. यापुढे ऑनलाइन पंच-इन व पंच-आऊट प्रणालीद्वारे 100 टक्के हजेरी नोंदविणे बंधनकारक राहणार आहे. महिन्यात तीन वेळा उशिरा हजेरी नोंदवल्यास एक दिवसाची रजा धरली जाणार आहे. तसेच हजेरी नोंदवली नाही तर संबंधितांचे वेतन रोखण्यात येईल. सतत गैरहजर राहणार्‍यांविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव दाखल करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषदेत कार्यरत कर्मचारी व अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago