नाशिक

तीन बळी गेल्यानंतर मनपाला आली जाग

मुक्तिधाम परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
येथील मुक्तिधाम व सोमाणी उद्यान परिसरात प्रचंड प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळेच मंगळवारी सकाळी मायलेकीला तसेच जन्माला न आलेल्या बाळाचा अपघाताने बळी घेतला. परिणामी, सदरचा अपघात हा अतिक्रमणामुळे झाला. याबाबत सर्व बाजूंनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर टीकेची झोड उठवल्यानंतर महापालिकेला काल जाग आली. मात्र, त्यांनी ज्या मुक्तिधामच्या ठिकाणी अपघात झाला तेथील अतिक्रमण न काढता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असलेल्या प्रेसलगतच्या भिंतीजवळील अतिक्रमण काढल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे अपघात झाला कुठे आणि अतिक्रमण काढताय कुठे, अशी चर्चा परिसरात रंगली होती.
मंगळवारी सायंकाळी येथील मुक्तिधामसमोर सुनीता भीमराव वाघमारे ही पन्नास वर्षीय महिला अपघातात ठार झाली. त्यानंतर तिच्यासोबत असलेली मुलगी शीतल केदरे हीसुद्धा अपघातात जखमी झाली व दुसर्‍या दिवशी तिचे निधन झाले. तसेच उपचारादरम्यान शीतलचे बाळ या अपघातात दगावले. शीतल ही बाळंतपणासाठी आईकडे आली होती. या अपघातात तिघांचा बळी गेल्याने संपूर्ण नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत
होती.
दरम्यान, अपघाताच्या या घटनेनंतर व ज्या अतिक्रमणांच्या कारणामुळे अपघात झाला त्यामुळे नाशिकरोड परिसरातील नागरिकांनी व राजकीय पक्षांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे अतिक्रमण विभागाला काल प्रथमच जाग आली. मात्र, त्यांनी ज्या ठिकाणी अपघात झाला तेथील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असलेल्या सिक्युरिटी प्रेसच्या भिंतीलगत अनधिकृत नऊ टपर्‍यांचे अतिक्रमण काढले. त्यामुळे नागरिक आश्चर्यचकित झाले. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, अशी चर्चा परिसरात रंगली होती.
मुक्तिधाम व सोमाणी उद्यान परिसरातील अतिक्रमण काढावे म्हणून माजी नगरसेवक व भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनकरराव आढाव यांनी काही महिन्यांपूर्वीच महापालिका आयुक्तांना व मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले होते.
याबाबत आपण लक्ष देऊ, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा आढाव यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविल्याचा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago