स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
नाशिक :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचेमार्फत 23 ते 26 मे, 2022 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने
“पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. या
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास
विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना
कामाची आवश्यकता आहे. याकरीता नियोक्ते आणि नोकरी ईच्छूक उमेदवारांसाठी
ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करून एका छत्राखाली ही सुविधा उपलब्ध
करून देण्यात येत आहे. यामधील मुलाखती मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे
स्काईप, व्हॉट्सअप इत्यादी माध्यमांद्वारे घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा
योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर किंवा अँण्ड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam हे ॲप
डाऊनलोड करून नोंदणी करावी.
नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी
सादर केलेल्या पदानुसार आवश्यक कागदपत्रे व निकष पूर्ण करीत असल्यास त्या
उमेदवारांची निवड नियुक्ती धारकांकडून भ्रमणध्वनीद्वारे मुलाखत घेवून करण्यात येणार
आहे. भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर “पंडित दीनदयाळ उपाध्याय
जॉब फायर” या ऑप्शन वर क्लिक करुन नाशिक ऑनलाईन जॉब फायर -2 (2022-23)
यावर जनरल, ईपीपी, ॲप्रटिंस आदी रिक्तपदे अधिसूचित करावी. तसेच सदर
मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागावरील वेबपोर्टलवर विनामुल्य
करावी, असेही नमुद करण्यात आले आहे.
नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी
क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन
रोजगार मेळाव्यात भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी सहभाग घ्यावा,
असे आवाहन सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.