20 हजारांची लाच घेताना सहाय्यक महिला पोलीस निरीक्षकास अटक

नाशिक : प्रतिनिधी

भद्रकाली पोलीस स्टेशनच्या साहाय्यक महिला  पोलीस निरीक्षकास 20 हजार रूपयांची लाच घेताना  अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह  पोलीस नाईक  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या   जाळ्यात अडकले आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक  प्रणिता पवार आणि  पोलीस नाईक बैरागी असे अटक करण्यात आलेल्या पोलीसांची नावे आहेत. दोघेही भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कालच आडगाव पोलीस ठाण्यात 20 हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीसाला अटक करण्यात आली होती. दोन दिवसांत दोन कारवाया करण्यात आल्याने   पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लाचखोरीमुळे खाकी डागाळली
दोन दिवसांत पोलीस खात्यातील तिघेजण लाचलुचपत च्या जाळ्यात अडकल्याने पोलिसतील लाचखोरी पुन्हा ऐरणीवर आली आहे. कालच आडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी राजेश थेटे यास लाचप्रकरणी अटक केली होती, त्यामुळे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आडगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाची तडकाफडकी बदली केली होती. त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि एक कर्मचारी लाच घेताना सापडले. एकीकडे गृह विभाग खाकीची प्रतिमा उजळण्यासाठी प्रयत्न करत असताना नाशिक मध्ये पोलिसांच्या लाचखोरी मुळे खाकीची प्रतिमा डागाळली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *