नाशिक

अनामत परताव्यासाठी 243 पैकी फक्त 12 जणांचेच अर्ज

उमेदवारांची उदासीनता, राजकीय पक्षांचाही प्रतिसाद नाही; आता ‘येईल त्याचा अर्ज’ या तत्त्वावर परतावा प्रक्रिया

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारांना अनामत देण्यास पालिका टाळाटाळ करत असल्याचा आरोप एकीकडे होत असतानाच दुसरीकडे, राजकीय पक्षांच्या उमेदवारांचीच अनास्था असल्याचे समोर आले आहे.
243 उमेदवारांपैकी केवळ 12 उमेदवारांनीच परताव्यासाठी अर्ज सादर केल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारांच्या या अनास्थेमुळेच परतावा प्रक्रिया रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांचा अनामत रकमेचा परतावा एकाच वेळी वितरित करण्याचा प्रशासनाचा प्रारंभिक विचार होता. त्यामुळे कामकाज सुसूत्र राहण्यास मदत झाली असती. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने गेल्या महिन्यात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्यांच्या उमेदवारांचे अर्ज एकत्रित सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, महिना उलटूनही ना राजकीय पक्षांकडून प्रतिसाद मिळाला, ना उमेदवारांकडून अर्ज आले. परिणामी, अर्ज केलेल्या 12 उमेदवारांचाही परतावा अडकून राहिला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उमेदवारांनी नगरपरिषद प्रशासनावर परतावा मुद्दाम रोखून धरल्याचा आरोप केला होता. मात्र, प्रशासनाने दिलेल्या माहितीनंतर उमेदवार व राजकीय पक्षांनीच अर्ज प्रक्रिया पूर्ण न केल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष परतावा सुरू झाल्यानंतर या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता भूमिका बदलत प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व अर्जांची वाट न पाहता, ज्या उमेदवारांचे अर्ज प्राप्त होतील त्यांची पडताळणी करून तातडीने अनामत रक्कम परत केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांच्या निवडणूक खर्चाच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच उमेदवारांनी विनंती केल्यास रोख स्वरूपातही रक्कम देण्याची सोय ठेवण्यात आली आहे.

दोन दिवसांत प्रक्रिया सुरू

सर्व उमेदवारांना एकाच वेळी परतावा द्यायचा आमचा प्रयत्न होता, जेणेकरून इतर प्रशासकीय कामांवर परिणाम होणार नाही. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने आता प्राप्त 12 अर्जांची पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण केली जाईल. येत्या दोन दिवसांत उमेदवारांना रक्कम मिळण्यास सुरुवात होईल, असे लेखाधिकारी सचिन पगार यांनी सांगितले.

अनामत रकमेचे स्वरूप

नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांकडून पुढीलप्रमाणे अनामत रक्कम घेण्यात आली होती. सर्वसाधारण गट : 2,000 रुपये, ओबीसी/ एससी/एसटी गट : 1,000 रुपये, महिला उमेदवार (सर्व गट) : 1,000 रुपये.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago