निवडणूक आयोगाचा अजब कारभार
पंचवटी : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध राज्यातील विरोधी पक्ष एकवटलेले असताना त्याचे पुरावे समोर येत आहेत. नाशिकरोड येथील वृत्तपत्र विक्रेत्याचे वय 48 असताना मतदान ओळखपत्रावर त्याचे वय 126 दाखवले आहे. त्यामुळे शहरातील हा तरुण सर्वांत जास्त वयाचा मतदार ठरला आहे.
निवडणूक आयोगाच्या घोळाचा फटका बसलेला हा नवमतदार नाशिकरोडमधील सुभाषरोड परिसरात वास्तव्यास आहे. गौतम संपत सोनवणे (वय 48) असे त्या मतदाराचे नाव असून, ते वृत्तपत्र विक्रीचे काम करतात. नवीन मतदार ओळखपत्र मिळण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रे सादर करून ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना दिलेल्या पत्त्यावर नवीन मतदार ओळखपत्र मिळाले. पण त्यातील सावळागोंधळ पाहून तेही हबकले. सादर केलेल्या कागदपत्रानुसार त्यांचा जन्म दिनांक 5 डिसेंबर 1977 असून, त्यांचे वय 48 आहे. आयोगाने दिलेल्या ओळखपत्रात जन्म दिनांक 30 डिसेंबर 1899 दाखविण्यात आले,तर वय 126. निवडणूक आयोगाच्या या करामतीमुळे अद्याप पन्नाशीही पार न केलेला हा मतदार 126 वर्षांचा सर्वाधिक वयाचा ज्येष्ठ नागरिक ठरला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर सोनवणे यांनीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मतदार यादीमधील घोळ सांगताना कुणाचे वय किती आणि कोण कुणाचा मुलगा आणि पिता हेच समजत नाही, असे वक्तव्य करताना मोठा विनोदही केला होता. नाशिकमध्येही असाच प्रकार समोर आला होता. नाशिक मध्य मतदारसंघात एकाच घरात 813 मतदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अधिकार्यांनी हा दावा खोडून काढला होता. आता या मतदार ओळखपत्रात जन्माचे साल 1899 दाखविले आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. यावरून मतदारयादी तसेच ओळखपत्रातील घोळ असल्याच्या विरोधकांकडून होणार्या आरोपांना एकप्रकारे पुष्टीच मिळाली आहे.
जुन्याच चुका पुन्हा पुन्हा
मतदार यादी आणि ओळखपत्र यातील चुका या वर्षानुवर्षे कायम आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस मतदारांचे नाव न सापडणे, ओळखपत्रावरील फोटो चुकीचा, पत्ता बदल या चुका घडत असतात. त्यात काहीच सुधारणा होत नाही. सद्या विरोधी पक्षांकडून याच मुद्दयावर आयोगाला जाब विचारण्यात येत आहे. मात्र, या चुका दुरुस्त होत नसल्याने त्या कायम आहेत.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…