नाशिक

सिन्नरकरांवर ऐन दिवाळीत पाणीटंचाईचे संकट

भाजपाचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी

सिन्नर ः प्रतिनिधी
सिन्नर शहरासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून 100 कोटींच्या निधीतून राबविण्यात आलेली कडवा धरणावरील पाणीपुरवठा योजनेचा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने तसेच पर्यायी ट्रान्स्फॉर्मर नसल्याने शहरवासीयांवर ऐन दिवाळीत पिण्याच्या पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून, नगरपालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ना. कोकाटे यांच्या प्रयत्नातून 100 कोटींची कडवा धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. परंतु, पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचारात अडकली. कुणी किती पैसे खाल्ले, याची चर्चा गावभर झाली. अनेक अडथळे पार करीत एकदाची योजना पूर्ण होऊन पाणी यायला लागले. परंतु, लगेच पाइप फुटू लागले, शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जाऊ लागले. शिवडे गावाजवळ पाइपला गळती लागून बंधारा भरू लागला.
स्वतंत्र वीज मिळाल्यावर आता ट्रान्स्फॉर्मर जळू लागले. नगरपालिका एवढी सक्षम की, पर्यायी व्यवस्था नाही. यांच्या खेळात जनता होरपळून निघाली आहे. सुरुवातीला दोन -तीन दिवसांनी पुरवठा केला जात होता आता तर तो सहा-सात दिवसांवर येऊन पोहोचला आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या पर्वात नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.
तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी एवढा मोठा कालावधी लागणे हे कितपत योग्य आहे? पाणीपट्टी वसुलीसाठी नगरपालिका ज्या पद्धतीने तगादा लावते, त्याच तत्परतेने पाणीपुरवठा का केला
जात नाही.
24 तास पाणीपुरवठा करणारी महत्त्वाकांक्षी योजना जर सदोष असेल तर ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही? असे प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आले आहे. मुख्याधिकार्‍यांनी शहरवासीयांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी भाजपाचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब हांडे, देवयानी वाघ, चव्हाण, मुकुद खर्जे, डॉ. दीपककुमार श्रीमाली, किशोर देशमुख,
प्रमोद उगले, नाना बाबर, संतोष चव्हाण, गंगाराम खैरे, पोपटराव पगार आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

24 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

24 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago