सिन्नर तालुक्यातील शेतकर्यांना आवाहन
सिन्नर : प्रतिनिधी
खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेची नोंदणी सुरू झाली असून, सिन्नर तालुक्यातील पात्र शेतकर्यांनी 31 जुलैपूर्वी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वादळ, गारपीट तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कारळे, मूग, उडीद, तूर, कापूस, मका आणि कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकर्यांना सामाईक सेवा केंद्र (सीएससी), संबंधित बँक किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करता येणार आहे. शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून वेळेत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभाग व इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने केले आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी तालुक्यातील अधिकाधिक शेतकर्यांनी योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, विमा कंपनीचे तालुका समन्वयक सुयोग वाजे यांनी
केले आहे.
पीकनिहाय शेतकरी हिस्सा
(1 हेक्टर / 2.5 एकर)
पीक प्रीमियम (रु.)
भात (तांदूळ) – 1,150
ज्वारी – 660
बाजरी – 640
नाचणी – 315
भुईमूग – 900
सोयाबीन – 1,150
कारळे – 400
मूग – 460
उडीद – 450
तूर – 1,400
कापूस – 3,225
मका – 800
कांदा – 1,500
Opportunity for crop insurance scheme until July 31