नाशिक

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याविरुद्ध विरोधक आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

नाशिक : प्रतिनिधी
नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर संसदेकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला करणार्‍या पोलिसांचा निषेध करत दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल बुधवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.

राहुल गांधींसोबत गैरवर्तन
काँग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नाशिक : प्रतिनिधी
दिल्लीतील नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी कथित गैरवर्तन केल्याचा तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष नीलेश (बबलू) खैरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान दिल्ली पोलीस हाय हाय, मोदी सरकार निकम्मी है, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, उद्धव पवार, ज्ञानेश्वर काळे, अरुण दोंदे, जयेश पोकळे, विजय राऊत, सुदेश मोरे, संदीप वाघ, वृंदा शेरे, ज्युली डिसूझा, रमेश जाधव, भारत पाटील, विजय पाटील, जाकीर अत्तार, दत्ता सोनवणे, समाधान बागूल, अनिल बहोत, हर्षल पवार, जावेद पठाण, मुश्ताक कुरेशी, ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष कस्तुरे, मोहन शिंदे, गौरव सोनार, भालचंद्र पाटील, इसाक कुरेशी, हेमंत पवार, प्रभाकर धात्रक, प्रवीण काटे, संजय पवार, सईद मनियार, बबलू सय्यद, अफरोज खान, राजेंद्र महाले, समीर शेख, हर्षवर्धन कापडणीस, अजिंक्य देवरे, विजय भालेराव, गोरख साळवे, अपूर्वा जाधव, गौरी जाधव, ऐश्वर्या डिसूझा, अयान खान, उमेश दासवाणी, सोमनाथ मोहिते, राहुल रौंदळ, अमोल सोनवणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.
एनटीए बरखास्त करून परीक्षा प्रणाली पारदर्शक व सुरक्षित करावी.
नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
कथित लाठीहल्ल्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.

Opposition aggressive over lathi-charge on students.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago