नाशिक

पाच दुकाने फोडून एक लाख 12 हजारांची चोरी

सराईत चोरटा जेरबंद

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड भागातील जुने बिटको हॉस्पिटल परिसरात एकाच रात्री पाच दुकाने फोडून एक लाख 12 हजार रुपयांची रोकड चोरणार्‍या सराईत चोरट्याला नाशिक गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने अटक केली आहे. आरोपीने तीन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
जुने बिटको हॉस्पिटल परिसरात 14 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या पाच दुकानफोडी प्रकरणाचा छडा लावत नाशिक गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने धन्ना रामलाल राठोड (वय 40, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) याला अटक केली आहे. या चोरीत एकूण 1 लाख 12 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती.
चोरट्यांनी एका भांड्याच्या दुकानासह दोन मेडिकल, एका एजन्सीचे दुकान आणि एका मिठाई दुकानाचे शटर व कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरून नेली होती. या धाडसी चोरीमुळे परिसरातील व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात 15 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना नाशिकरोड युनिटच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तीन साथीदारांसह पाचही दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईनंतर परिसरातील व्यापार्‍यांनी पोलिसांचे कौतुक केले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.

Five shops broken into; goods worth ₹1.12 lakh stolen.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago