४३५ सोसायट्यांना शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे आदेश ना . छगन भुजबळ

शेतकऱ्यांना दिलासा

नाशिक : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात अनिष्ट तफावतीतील ४३५ विविध कार्यकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेच्या वतीने कर्जवाटपासाठी निधी बंद करण्यात आला होता . याबाबत राज्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या तसेच गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा उपनिबंधक , जिल्हा बँक प्रशासक व प्रशासकीय संचालक यांची एकत्रित बैठक घेत तातडीने या संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचे आदेश दिले होते . त्यानुसार जिल्हा बँकेच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले असून , जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांना सभासदांना कर्जपुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत . त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . जिल्ह्यात एकूण ४३५ अनिष्ट तफावतीतील संस्था असून , यात येवल्यातील एकूण २३ संस्थांचा समावेश आहे . या संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत जिल्हा बँकेने अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांना कर्ज पुरवठा न करण्याचा निर्णय मागे घेऊन नियमित करण्याची मागणी करण्यात आली होती . त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांकडून याचा आढावा घेत वेळोवेळी बैठका घेतल्या . तसेच जिल्ह्यातील अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर गेल्या आठवड्यात सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन कर्जपुरवठा नियमित करण्याचे आदेश दिले होते . त्यानुसार जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रक काढले असून , अटी शर्थींची पूर्तता करून सभासदांना कर्जवाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत . त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *