येवल्यात खासदार भगरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
येवला : प्रतिनिधी
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 10) येथील तहसील कार्यालयात विविध शासकीय विभागांची महत्त्वाची आढावा बैठक झाली. या बैठकीत खासदार भगरे यांनी शहर व ग्रामीण भागातील प्रलंबित नागरी समस्यांचा सविस्तर आढावा घेत, विविध प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले. यावेळी उपस्थित नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत खासदारांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या.
बैठकीत नागरिकांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न खासदारांच्या निदर्शनास आणून दिले. विशेषतः नगर-मनमाड मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार करण्यात आली. याची गंभीर दखल घेत खासदार भगरे यांनी संबंधित अधिकार्यांना कामाची गुणवत्ता तपासून तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. तसेच ग्रामीण भागातील वीज खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे यांसारख्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे
निर्देश महावितरणच्या अधिकार्यांना देण्यात आले. याशिवाय, काही पतसंस्थांमधील ठेवीदारांचे प्रलंबित पैसे परत मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) येवला शहरप्रमुख योगेश सोनवणे यांनी शहर व ग्रामीण भागात सक्तीने बसविण्यात येणार्या स्मार्ट वीज मीटरचा मुद्दा उपस्थित केला. तसेच नगरपालिकेकडून मुदतपूर्व केली जाणारी घरपट्टी-पाणीपट्टी वसुली आणि दंड आकारणी यावर आक्षेप घेतला. यावर खासदार भगरे यांनी नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन योग्य ती लवचिक कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. बैठकीपूर्वी तहसील कार्यालयाच्या आवारात खासदार भगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. माणिकराव शिंदे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख सुभाष निकम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख छगन आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, महेंद्र पगारे, पंकज माळी, नगरसेविका राणी अन्सारी, अनिल मुथा, संतोष गोरे, नानासाहेब शिंदे, सचिन कड, सागर पडवळ यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
बैठकीत नागरिकांच्या अनेक समस्यांवर अधिकार्यांसमक्ष तात्काळ तोडगा काढण्यात आला. सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी म्हणून खासदार भगरे यांचा लौकिक आहे. जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, यासाठी त्यांनी दर दोन महिन्यांनी अशी आढावा बैठक घ्यावी, अशी सर्व कार्यकर्ते व नागरिकांची मागणी आहे.
-अॅड. माणिकराव शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष,
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
Orders issued to officials to resolve pending civic issues.
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…
बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…
निफाड : तालुका प्रतिनिधी यंदा अत्यल्प पाऊस असतानाही शेतकर्यांनी महागडी औषधे, कीटकनाशके व पोषकांची फवारणी…
नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…
तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…