नाशिक

आमची निष्ठा पक्षासोबतच; नगरसेवकांची ग्वाही

कथित फुटीच्या चर्चेनंतर ठाकरेंची पदाधिकार्‍यांसमवेत बैठक

नाशिक : प्रतिनिधी
आम्ही कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही. आता व यापुढेही पक्षासोबतच राहू. फुटीच्या बातम्या निरर्थक असून, जाणूनबुजून याबाबतच्या बातम्या पेरल्या जात आहेत; परंतु आमच्यातील कोणीही कुठे जाणार नाही, असा ठाम विश्वास नाशिक महापालिकेच्या पंधरा नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.
नाशिकमधील ठाकरे सेनेचे बारा नगरसेवक शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चा समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर खबरदारी म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावले होते.
यावेळी ठाकरे यांनी सर्वांसोबत चर्चा करत नाशिकमधील स्थिती जाणून घेतली. यावेळी शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत, उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, मनपा गटनेते केशव पोरजे तसेच नगरसेवक भारती ताजनपुरे, शैलेश ढगे, सीमा पवार, प्रमिला मैंद, मंगला आढाव, रुचिरा साळवे, योगेश भोर, वैशाली दाणी, योगेश गाडेकर, संजीवनी हांडोरे, मुरलीधर भामरे, माधुरी ढेमसे, वैशाली दळवी व पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांनी पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करत आगामी काळात पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी सविस्तर संवाद साधला. नाशिकमधील संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक राजकारण आणि आगामी निवडणुकांची तयारी याबाबत त्यांनी माहिती घेतली. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवा, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवा आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नगरसेवकांनी पक्षप्रमुखांना विश्वास देताना सांगितले की, नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सक्षम करण्यासाठी सर्वजण एकदिलाने काम करतील. पक्षाशी एकनिष्ठ राहून आगामी सर्व राजकीय आव्हानांचा सामना करण्याचा निर्धारही व्यक्त केला. दरम्यान, या बैठकीमुळे नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील नगरसेवकांबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पक्षप्रमुखांनी दिलेल्या मार्गदर्शनानंतर नगरसेवक नव्या उत्साहाने संघटनात्मक कामात सक्रिय होणार असल्याचेही स्पष्ट झाले. नाशिक महापालिकेतील शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबईतील शिवसेना भवन (मातोश्री) येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पक्षाशी आपली निष्ठा कायम असल्याचा शब्द दिला.

’जनतेत जाऊन काम करा’
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवक व पदाधिकार्‍यांना सूचना करताना म्हटले की, अफवांकडे लक्ष देऊ नका. पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून अधिक जोमाने कामाला लागा. जनतेमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्या, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्हा सर्व नगरसेवकांविषयी अतिशय आनंदी होते. नाशिकच्या खासदारांनी निष्ठा दाखवत कुठल्याही आमिषाला बळी न पडता पक्षासोबत निष्ठा ठेवली. आताही सर्व नगरसेवकांनी पक्षावर विश्वास ठेवत निष्ठा काय असते, हे दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सर्व नगरसेवकांनी कुठेही जाणार नसल्याचा निर्धार त्यांच्याकडे व्यक्त केला. पक्षवाढीसाठी हवे ते प्रयत्न करणार असल्याचीही खात्री दिली.
– केशव पोरजे, गटनेते, शिवसेना (उबाठा) पक्ष, नाशिक

 

Our loyalty lies with the party; corporators pledge.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago