नाशिक

अवैध प्रवासी वाहतुकीला एसटीचा दणका

320 वाहनांवर कारवाई; साडेदहा लाखांचा दंड वसूल

नाशिक : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी नाशिक विभागात एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग झोनची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 5 जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत 14 जुलै 2026 पर्यंत 320 खासगी वाहनांवर कारवाई करून दहा लाख 55 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध बैठकांत अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या महसुलात घट होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी भगवान धुगे यांच्या नेतृत्वाखाली आगार व्यवस्थापक, वाहतूक पर्यवेक्षक, स्थानिक पोलीस आणि आरटीओ यांच्या संयुक्त पथकाकडून बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
भगवान धुगे यांनी प्रवाशांना आवाहन करताना सांगितले की, अवैध प्रवासी वाहतूक सुरक्षित नसून एसटीची सेवा ही सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो एसटी बसनेच प्रवास करावा.

ST cracks down on illegal passenger transport

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago