‘हरित महाराष्ट्र’ अभियानात 6.91 लाखांहून अधिक वृक्षलागवड पूर्ण

नाशिक : प्रतिनिधी
शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान आणि 300 कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 6 लाख 91 हजार 823 वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्याला देण्यात आलेल्या 31 लाख 20 हजार 50 वृक्षलागवडीच्या उद्दिष्टापैकी 22.17 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने नाशिकची दमदार वाटचाल सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
अभियानात वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेल्वे, उच्च व तंत्रशिक्षण, मृद व जलसंधारण विभाग तसेच विविध सहयोगी संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वन विभागाने 2 लाख 77 हजार 901, तर सामाजिक वनीकरण विभागाने 2 लाख 12 हजार 397 वृक्षांची लागवड केली आहे. रेल्वे विभागाने आपले शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 125 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. मृद व जलसंधारण विभागाने 96.67 टक्के प्रगती नोंदवली असून, एक पेड माँ के नाम 2.0 अभियानालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने वृक्षलागवडीसाठी हा सर्वाधिक अनुकूल काळ असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी केवळ शासनाची नसून, प्रत्येक नागरिकाची असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले
आहे.

हरित महाराष्ट्र अभियानातील नाशिकची कामगिरी
एकूण उद्दिष्ट : 31,20,050 वृक्ष आतापर्यंत लागवड : 6,91,823 वृक्ष उद्दिष्टपूर्ती : 22.17 टक्के वन विभाग : 2,77,901 वृक्ष सामाजिक वनीकरण विभाग : 2,12,397 वृक्ष रेल्वे विभाग : 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 125 टक्के उद्दिष्टपूर्ती मृद व जलसंधारण विभाग : 96.67 टक्के प्रगती

सध्याचा पावसाळा हा वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. उन्नत नाशिकची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी खासगी कंपन्या, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. सर्वांच्या सहभागातूनच हरित, समृद्ध आणि पर्यावरणपूरक नाशिक घडविणे शक्य होईल.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

Over 6.91 lakh trees planted under the ‘Green Maharashtra’ campaign.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *