समृद्धीवर ट्रेलरला आग; चालक जळून खाक

वावी शिवारातील मध्यरात्रीची भीषण दुर्घटना; ट्रकला पाठीमागून धडक

सिन्नर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर टायर
फुटल्याने रस्त्यावर थांबलेल्या कंटेनरला मागून आलेल्या एलएनजी ट्रेलरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रेलरमधील लोखंडी कॉइल तुटून एलएनजी गॅस टाकीच्या भागात स्पार्क झाल्याने क्षणार्धात ट्रेलरने पेट घेतला. या आगीत ट्रेलरचालक गंभीररीत्या भाजला आणि उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा सहकारी या भीषण अपघातातून बालंबाल बचावला. ही घटना वावी शिवारातील चॅनल क्रमांक 538 जवळ शनिवारी (दि. 8) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
मृत चालकाचे नाव गुलशर अली मोहम्मद हनीफ (32, रा. जमुहार, ता. चुनार, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे आहे. तर ट्रेलरमधील सहकारी शंभुनाथ यादव हा या दुर्घटनेतून बचावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजे 10 जीबी 6730 क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जात असताना त्याचे टायर फुटले. त्यामुळे कंटेनर महामार्गावर थांबला होता. त्याचवेळी मागून आलेल्या एमएच 14 एलबी 1089 व एमएच 14 केयू 8956 क्रमांकाच्या ग्रीन लाईन एलएनजी ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक झाली. धडकेनंतर ट्रेलरमधील लोखंडी कॉइल तुटून कॅबिनच्या मागील बाजूस असलेल्या एलएनजी गॅस टाकीच्या परिसरात स्पार्क झाला. त्यानंतर ट्रेलरला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील क्यूआरबी पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत गुलशर अली मोहम्मद हनीफ गंभीररीत्या भाजले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास वावी पोलिस
करीत आहेत.

कंट्रोलला 12.02 वाजता माहिती

अपघाताची माहिती रात्री 12.02 वाजता कंट्रोलला देण्यात आली. त्यानंतर मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी कोन बॅरिकेड्स करण्यात आले. अपघातस्थळी एमएसएफचे मनोज साबळे, आरपीव्ही गोंदे टीम, एचएसपीचे पीएसआय उगले, पोलिस कर्मचारी पवार व ढाकणे तसेच क्यूआरव्ही गोंदे आणि शिर्डी टीम यांनी मदतकार्य केले.

Trailer catches fire on Samruddhi Expressway; driver burnt to death.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *